नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला उभारी; ३२.४५ लाख कोटींचा वित्तपुरवठा होणार
16-Sep-2024
Total Views | 13
मुंबई : केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. बँका आणि वित्तीय संस्थांनी हरित प्रकल्पांसाठी ३२.४५ लाख कोटींचा वित्तपुरवठा करण्यास वचनबद्ध केले आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला चालना मिळणार असून बँका आणि वित्तीय संस्था ३२.४५ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
दरम्यान, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी बँका आणि वित्तीय संस्थांनी २०३० पर्यंत ३८६ अब्ज डॉलर अतिरिक्त वित्तपुरवठा करण्याचे वचन दिले आहे. आम्हाला २०३० पर्यंत 500 GW चे लक्ष्य गाठण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच विकासक, उत्पादक आणि वित्तीय संस्थांकडून मोठ्या वचनबद्धतेची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील विकासकांनी अतिरिक्त 570 गिगावॅट क्षमता जोडण्यासाठी वचनबद्ध केले आहे. उत्पादकांनी सौर मॉड्यूल्समध्ये 340 GW, सौर सेलमध्ये 240 GW, पवन टर्बाइनमध्ये 22 GW आणि इलेक्ट्रोलायझर्समध्ये 10 GW अतिरिक्त उत्पादन क्षमता वाढविली आहे. २०३० पर्यंत 386 अब्ज डॉलर अतिरिक्त वित्तपुरवठा करण्याचे वचन दिल्याचेही ते म्हणाले.