पुणे : पुण्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्' या संस्थेतर्फे दिला जाणाऱ्या ‘आर्यन सन्मानासाठी’ अर्ज करण्यासाठी आणि कलाकृती पाठविण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
चित्रपट आणि नाटकांना प्रदान केला हा जाणारा या क्षेत्रातील महत्वाच्या सन्मानांपैकी एक आहे. १ जून २०२३ ते दि. ३१ मे २०२४ मध्ये या कालावधी दरम्यान तयार झालेल्या चित्रपट आणि नाटके या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत. कलाकृती पाठवण्याची अंतिम तारीख १ सप्टेंबर आहे. या स्पर्धेचे अर्ज आणि स्पर्धेविषयी अधिक माहिती ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्' च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सन्मान सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. २०२३ मध्ये पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गेल्यावर्षी हा सोहळा पार पडला होता.