हिंडेनबर्ग प्रकरणावरून काँग्रेसला चोख प्रत्युत्तर; म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत......!
12-Aug-2024
Total Views | 52
मुंबई : हिंडेनबर्गने केलेल्या आरोपानंतर काँग्रेस पक्षाकडून जेपीसी चौकशीची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या मागणीवर भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली आहे. संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी फेटाळून लावताना भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा धोका असून देशातील गुंतवणूक नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याची टीका भाजपने विरोधकांवर केली आहे.
दरम्यान, भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काँग्रेस राजवटीत अनेक कथित घोटाळे झाले होते आणि तेव्हा असे गंभीर अहवाल का आणले गेले नाहीत. आता शॉर्ट-सेलिंग कंपनीचे आरोप आणि बाजार नियंत्रकावर विरोधकांची टीका हा व्यापक कटाचा भाग आहे. ते पुढे म्हणाले, “लोकांनी नाकारल्यानंतर, काँग्रेस, त्यांच्या जवळच्या मित्रांनी मिळून भारतात आर्थिक अराजकता आणि अस्थिरता आणण्याचा कट रचला आहे.
ते पुढे म्हणाले, छोट्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपला पैसा शेअर बाजारात गुंतवला आहे. काँग्रेसला आपले नुकसान का करायचे आहे, असा प्रश्न असून राहुल गांधी आणि त्यांच्या टूलकिट मित्रांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करत असताना, आता भारताचा द्वेष करू लागली आहे, असेही प्रसाद यांनी म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की, सेबीने गेल्या वर्षी अदानी समूहाच्या विरोधात स्टॉक मार्केटमध्ये फेरफार केल्याच्या आरोपात हिंडेनबर्गला नोटीस पाठवली होती. परंतु ते तपासात सामील झाले नाहीत आणि त्याऐवजी त्यांनी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना लक्ष्य केले आहे.