विमानतळाच्या फ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती!

    17-Jul-2024
Total Views | 36
airport flight conectivity central govt
 

नवी दिल्ली :      हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी डोनी पोलो विमानतळावरून फ्लाईट कनेक्टिव्हिटी वाढविण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांना लिहिलेल्या पत्रात खांडू यांनी आत्तापर्यंत प्रत्येकी एक विमान डोनी पोलो विमानतळावरून कोलकाता येथे चालवले जात आहे हे निदर्शनास आणून दिले आहे.

मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ईशान्येकडील राज्यातील कनेक्टिव्हिटी, पर्यटन आणि वाणिज्य सुधारण्यासाठी फ्लाईट कनेक्टिव्हिटी वाढविण्याची विनंती केंद्राला केली आहे. विशेष म्हणजे डोनी पोलो विमानतळावरून जवळ असणाऱ्या पर्यटन, वाणिज्य यांच्या वृध्दीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पत्रात म्हटल्याप्रमाणे, विमानतळावरून कोलकाता (आठवड्यातून सहा वेळा) आणि नवी दिल्ली (आठवड्यातून चार वेळा) प्रत्येकी एक विमान उड्डाण होत आहे.

ते म्हणाले, या उड्डाणे नियमितपणे पूर्ण क्षमतेने कार्यरत असून यात अनेकदा प्रवास भाड्यात प्रचंड वाढ होते. संभाव्य प्रवाशांसाठी तिकिटांची अनुपलब्धता, वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक बाबींसह दैनंदिन उड्डाण ऑपरेशन्सच्या अनुपस्थितीमुळे अभ्यागत, पर्यटकांसाठी प्रवेश सुलभतेत अडथळा निर्माण होतो याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

ते म्हणाले की इटानगर ते भोपाळ आणि कोची प्रवास करताना एकाच दिवसाची कनेक्टिव्हिटी नाही, ज्यामुळे प्रवाशांना नवी दिल्ली किंवा कोलकाता येथे अतिरिक्त रात्र घालवावी लागते. इटानगर ते अहमदाबाद प्रवास करताना ५ तास २५ मिनिटे आणि इटानगर ते बंगळुरू प्रवास करताना लेओव्हर ६ तासांचा आहे, असे ते म्हणाले. नोव्हेंबर २०२३ पासून उडान योजनेंतर्गत फ्लायबिगद्वारे संचालित इटानगर आणि गुवाहाटी दरम्यानची उड्डाण सेवा बंद केल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी रोष व्यक्त केला होता.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121