बँकेत नोकरीची मोठी संधी, तब्बल ४५९ जागांकरिता जाहिरात; अर्जाकरिता अंतिम मुदत जाणून घ्या

    01-Jul-2024
Total Views | 210
bank of baroda recruitment


मुंबई :     'बँक ऑफ बडोदा' अंतर्गत नव्या उमेदवारांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. 'बँक ऑफ बडोदा'अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत नमूद असलेल्या तपशीलानुसार अर्जप्रक्रिया करावी लागेल. 'बँक ऑफ बडोदा'मधील एकूण ४५९ रिक्त जागांकरिता होणाऱ्या भरतीकरिता वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अंतिम मुदत याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

डेटा सायंटिस्ट
आर्किटेक्ट
एमएसएमई विभागातील रिक्त जागा


शैक्षणिक पात्रता -

संबंधित विषयात मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातील पदवी
(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.)


वयोमर्यादा -

२४ ते ४५ वर्षे
 

अर्ज शुल्क -

जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाकरिता ६०० रुपये
महिला, एससी, एसटी व पीडब्ल्यूडी प्रवर्गाकरिता १०० रुपये


या भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०२ जुलै २०२४ असेल.


भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट्स जाणून घेण्याकरिता येथे क्लिक करा


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121