जामीन आणि सुटका यात जमीन आसमानचा फरक! राऊतांनी समजून घ्यावा
21-Jun-2024
Total Views | 133
मुंबई : जामीनावर बाहेर असणे आणि सुटका मिळणे यात जमीन आसमानचा फरक आहे. तो संजय राऊतांनी समजून घ्यावा, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी ईडीवर टीका केली होती. नितेश राणेंनी आता त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत आणि अरविंद केजरीवाल हे सगळे जामीनावर बाहेर आहेत. त्यांची सुटका झालेली नाही. त्यांना तारखांवर जावं लागतं. त्यामुळे जामीनावर बाहेर असणं आणि सुटका होणं यात जमीन आसमानचा फरक आहे. तो समजून घ्या आणि त्यानंतर ईडी सीबीआयबाबत बोला," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आज योगा दिवस साजरा करताना दिसतोय. यासाठी पंतप्रधान मोदींचे जेवढे आभार मानायला हवे तेवढे कमी आहेत. पंतप्रधान मोदींची तुलना देशी ब्रँडीसोबत करणारे संजय राऊतांसारखे लोक किती व्यसनाधीन झाले असतील हे लक्षात येतं. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कधीच योगा दिवस साजरा करताना दिसत नाही. त्यामुळे देशी दारू आणि देशी ब्रँडीमध्ये ज्यांना जास्त रस आहे त्यांनी पंतप्रधान मोदींवर बोलण्याची हिंमत करु नये," असेही ते म्हणाले.