नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू कोर्टाने दणका दिला असून न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने केजरीवाल यांची चौकशी केली होती. या चौकशीत ईडीने न्यायालयात आपली बाजू मांडली असून कोर्टाने कोठडीत वाढ केली आहे.
दरम्यान, कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत दि. ०३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ०१ जूनपर्यंत जामिनावर सुटका करण्यात आली होती. मुदत संपताच केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केल्याचे पाहायला मिळाले होते.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दि. २१ मार्चला अटक करण्यात आली होती. त्यानंतर केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. दरम्यान, अरविंद केजरीवाल दिल्ली सरकारचा कारभार कारागृहातून चालवित आहे.