आधी छत्रपतींचा अवमान, आता द्वारकादर्शनाला म्हणाले ड्रामा! राहुल गांधींची जीभ घसरली
04-May-2024
Total Views | 1207
(राहुल गांधींनी रविंद्र धंगेकर यांच्या सभेत द्वारकेबद्दल वादग्रस्त विधाने केली Photo - Op India)
पुणे : महाराष्ट्रातील पुणे लोकसभा उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आलेल्या सभेत राहुल गांधींनी पुन्हा मुक्ताफळे उधळली. शुक्रवार दि. ३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्वारका भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फेब्रुवारी २०२४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्वारकेचे दर्शन घेतले होते. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन समुद्रात बुडालेली द्वारका नगरीही पाहिली होती. यावेळी झालेल्या दिव्य अनुभूतीचा अनूभव त्यांनी देशवासीयांनाही दिला होता. ते म्हणाले होते की, "ही एक दिव्य अनुभूती होती. एक प्राचीन वैभव आणि अध्यात्मिक वैभव शाश्वत भक्तीचा अनूभव मी आज घेतला."
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या अध्यात्म आणि भक्तीचा पूर्वी वायनाड आणि आत्ता रायबरेलीतून अर्ज भरणारे खासदार राहुल गांधी यांनी पुण्यातील सभेत नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. “नरेंद्र मोदी पाकिस्तानबद्दल बोलेल.कधी समुद्रात जाऊन ड्रामा करतात, तुम्ही बघितलं का नाही मला माहिती नाही पण तो समुद्राखाली जाऊन घाबरला होता. काही झालं तर, राजकारणाची थट्टा करून ठेवली आहे." आपल्या भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधानांबद्दल बोलताना असभ्य भाषा उच्चारली.
Rahul Gandhi yet again displays his disdain for Sanatan.
Now mocks PM Modi for offering prayers at submerged city of Dvarka.
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) May 3, 2024
राहुल गांधींच्या त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सनातन धर्माबद्दल त्यांची घृणा स्पष्ट दिसू लागते. पुण्यातील जनसभेत राहुल गांधींनी संविधानासाठी दिखावा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानींवरही टीका केली. महिलांच्या खात्यात आम्ही १ लाख रुपये टाकणार असल्याचेही आश्वासन दिले.
प्राचीन द्वारका नगरीबद्दल हिंदू धर्मात विशेष मान्यता आहे. भगवान श्रीकृष्णाने देहत्याग केल्यानंतर तिला समुद्रात बुडवले. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी हजारो वर्षांपूर्वीचे या शहरातील अवशेषही शोधले आहेत. श्रीकृष्णाने मथूरा सोडून आपली राजधानी द्वारकेला वसवली. जिथे अरबी समुद्र आणि रेवतक पर्वतामुळे जनता असुरक्षित भासवत होती. प्राचीन याला साहित्यात द्वारावतीही म्हटले आहे. द्वारका समुद्राने वेढलेली होती. त्याची एक खूण 'भेंट द्वारका' द्वीपात आजही अस्तित्त्वात आहे. हिंदू धर्मीय आणि भगवान श्रीकृष्णाचे भक्त आजही त्याचे दर्शन करतात.
शिवछत्रपतींची प्रतिमा हटविण्यास सांगितली!
राहुल गांधींनी याच पुण्यातील सभेत छत्रपतीची प्रतिमा हटविण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा पुण्यातील सभेत कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी देऊन सन्मान केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात आली. मात्र, त्यांनी मूर्ती कार्यकर्त्याकडे परत दिली कार्यकर्त्याने ती त्यांच्या समोर ठेवली आणि तिथूनही मूर्ती हटविण्यास सांगितली.
पहा व्हिडिओ -
क्या राहुल गांधी छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा लेने से मना कर रहे हैं ?