'जय श्री राम'ची रिंगटोन वाजली म्हणून धर्मांधांकडून तरुणाला मारहाण!
23-May-2024
Total Views | 559
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जालना (Jalna Ringtone News) येथे एका हिंदू तरुणाला काही धर्मांधांनी जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना निदर्शनास आली आहे. फोनवर 'जय श्री राम' रिंगटोन वाजल्यामुळे या कट्टरपंथीयांनी हिंदू तरुणाला मारहाण केली, अशी माहिती मिळत आहे. या हल्ल्यात हिंदू तरुण गंभीर जखमी झाला असून सलग चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सुदर्शन वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, विकी नावाच्या तरुणावर हा हल्ला जालन्यातील परतूर भागात झाला. पीडित तरुण एका हॉटेलमध्ये आपल्या भावासोबत बसून जेवण करत होता. त्याचवेळी त्याला फोन आला. फोनवर 'जय श्री राम' रिंगटोन वाजली. त्या रिंगटोनमुळे धर्मांधांचा जळफळाट झाला आणि त्यांनी हिंदू मुलावर जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
यापूर्वी बेंगळुरूमध्ये मुकेश नावाच्या एका हिंदू दुकानदाराला त्याच्याच दुकानात हनुमान चालीसा वाजवल्यामुळे धर्मांधांनी मारहाण केली होती. अजानच्या वेळी तो हिंदू भजन वाजवत असल्याने धर्मांधांनी त्याला बेदम मारहाण केली होती.