मोहित सोमण
ब्लॉकचेन ही संकल्पना ७० च्या दशकात सुरु झाली ती त्याची खरी अंमलबजावणी २००० सालाच्या सुरूवातीला सुरू झाली. एक क्रांतीकारी बदल घडवणारी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असे त्याचे वर्णन करता येईल. आज सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेटावर्सची चर्चा सुरु झाली आहे. परंतु एक मात्रा अशी आहे जिथे ब्लॉकचेन वापराशिवाय कामच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला हा नक्कीच प्रश्न पडला असेल हे ब्लॉकचेन म्हणजे नक्की काय? स्वाभाविकच आहे भारतात त्याची हवीतितकी अंमलबजावणी झाली नसली तर या दशकपूर्तीत त्यांचे महत्व वाढणार आहे.
मुळात ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे 'माहिती भंडार' या संकल्पनेवर आधारित आहे. आयुष्यातील विविध पातळ्यांवर माहिती ही पूरक ठरते.आजच्या स्मार्टयुगात माहिती हेच तुमचे भांडवल व गुंतवणूक आहे. याच पद्धतीने ब्लॉकचेन (Blockchain) हे माहिती गोळा करून त्याचे भांडार करते. यामध्ये तुम्हाला हव्या त्या माहिती विषयी तुम्हाला आकलन करण्याची संधी प्राप्त होते.अर्थात हे ' विकिपीडिया' नसून त्याला एक विशिष्ट प्रकराची रचना केली जाते. यामध्ये आवश्यक त्या सदस्यांसोबत तुम्ही हे ज्ञान अथवा माहिती शेअर करू शकता. परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला या माहितीत बदल करता येतो जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानात करता येत नाही. त्यात बदल करण्याचे अधिकार काही लोकांनाच प्राप्त असतात.
बरेचदा इत्यंभूत माहितीची वानवा असल्याने व्यवसायांना आवश्यक ती माहीती मिळू शकत नाही. परिणामी धोरणे चुकत जातात व व्यवसायात नुकसान होते. परंतु ब्लॉकचेनचे भंडार तुम्हाला यातून लांब ठेवत हवी ती माहिती सहज एका बोटाच्या क्लिकवर मिळते.अनेक लोकांनी किंवा एका व्यक्तीने हे संग्रहण केल्याने यातील माहिती आपण बदलू शकत नसलो तरी या डेटाचे विकेंद्रीकरण केलेले असते.या डेटाचा वापर आपल्या सोयीप्रमाणे करू शकतात. अशाच एका पद्धतीतून बिटकॉईनचा वापर झाला होता.
२००८ मध्ये या निनावी व्यक्तींकडून या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची सुरूवात झाली होती.अर्थात ब्लॉकचेन व बिटकॉईनमध्ये फरक आहे. बिटकॉईनचा वापर चलन म्हणून केला जातो.तर ब्लॉकचेनचा जगभर वापर हा माहितीच्या देवाणघेवाणीसाठी केला जातो.
देशातील अनेक छोटेमोठे उद्योग सध्या ब्लॉकचेनचा यशस्वीपणे वापर करत आहेत. याचा मुख्य फायदा हा असतो की त्यामध्ये आपल्याला माहिती वाढवता येते त्यातून काही वजा करता येत नाही. त्यामुळेच कुठल्याही प्रकारची संपूर्ण माहिती यात भरता येते. मुख्यतः पैशाचे व्यवस्थापन व्यवहार यासाठी ब्लॉकचेनचा वापर प्रभावीपणे केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाशी व्यवहार केल्यास त्याची इत्यंभूत माहिती आपल्याला ब्लॉकचेनमध्ये अपलोड करता येते. पैसे देणेकरी घेणेकरी यांच्या संपूर्ण व्यवहारांच्या माहितीचे संकलन यात केले गेलेले असते. एक प्रकारचा पुरावा म्हणून हे तंत्रज्ञान कामाला येते.
यामध्ये एका डिजिटल लेजरप्रमाणे इत्यंभूत माहिती आपल्याला संकलन करता येते.यात अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला हव्या त्याच व्यक्तीला ही माहिती दिसू शकते. त्यात बदल काय करावा हे केवळ ज्यांच्याकडे नियंत्रण असते तोच करू शकतो. सामान्यपणे हे स्वातंत्र्य साध्या संगणक प्रणालीत शक्य नसते. ब्लॉकचेनमध्ये ऑटोमेशन करणे शक्य असते. यात वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या अनुक्रमणिकेनूसार माहिती संकलन करणे शक्य असते.
हे तंत्रज्ञान अनेक औद्योगिक क्षेत्रातील कार्यपद्धतीत उपयोगी पडते. या ब्लॉकचेनची माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून पडताळणी केल्यास नव्या प्रवाहातील माहिती मिळविणे सोपे होते. क्रिप्टोग्राफीक किजच्या माध्यमातून ब्लॉकचेनचा वापर करता येतो. यामध्ये त्या वापरण्याच्या पद्धतीत वेगवेगळे प्रकार येतात. यात तुम्ही खाजगी नेटवर्क किंवा संपूर्ण लोकांसाठी माहितीचे भांडार साठवू शकता.
हे तंत्रज्ञान संपले नाही काळानुरूप यात नवनवीन बदल होत आहेत त्याचाच भाग म्हणून यात साईडचेनचा (Sidechain) वापर होतो.यात डेव्हलपर मूळ साच्यात हात न लावता यात नवीन अपडेट्स आणू शकतात ही ब्लॉकचेनची खासियत आहे.
यात खाजगी डेटा इनस्क्रिप्टेडदेखील ठेवता येतो. परवानगीशिवाय त्याची हाताळणी तिसरी व्यक्ती करू शकत नाही. ब्लॉकचेनचे प्रमुख चार प्रकार आहेत १) पब्लिकचेन नेटवर्क २) परमिशन ब्लॉकचेन नेटवर्क ३) कंझोरटियम ब्लॉकचेन ४) हायब्रीड ब्लॉकचेन ५) साईडचेन. वापरानुसार यात अनेक कस्टमायझेशन उपलब्ध असते.
ब्लॉकचेनचा वापर एनर्जी, फायनान्स, मिडिया, रिटेल अशा विविध क्षेत्रातील दैनंदिन कामकाजासाठी वापरला जातो. भारताची अर्थव्यवस्था वेगात वाढत असताना ब्लॉकचेनचा वापर वाढवणे हे संयुक्तिक ठरेल. कारण वाढलेल्या व्यवहारात स्पष्टता, सुसुत्रता येण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणे सहज शक्य असते. भविष्यात वाढत्या मागणीमुळे माहितीत अचूकता आल्यास त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टळू शकते. केवळ क्लाऊड तंत्रज्ञानाप्रमाणे यात माहिती साठवता त्यावर माहितीची इत्यंभूत कारणमीमांसा मिळू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' ही घोषणा केली असल्याने सर्वात मोठा फायदा म्हणजे भ्रष्टाचारवर नियंत्रण हे ब्लॉकचेनचा अचूक माहितीप्रमाणे शक्य होणार आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासूर पायदळी तुडवून नवे रामराज्य आणायचे असल्यास तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य होणार आहे. दिवस बदलले आहेत त्यामुळे ब्लॉकचेनचा उदय हा सरकारच्या ' गुड गव्हर्नन्स' मध्ये देखील फळू शकतो.औद्योगिकीकरणात खाजगी क्षेत्रातील उद्योगांतर लोक संस्थेत ब्लॉकचेनचा वापर झाल्यास या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास वृद्धींगत होऊ शकतो.
याशिवाय मनी लॉन्ड्रिंग, पैशातील फेरफार, काळा पैसा याला ब्लॉकचेन हे प्रभावी उत्तर ठरणार आहे.भारतातील काही महत्वाच्या कॉर्पोरेट कंपन्यांनी ब्लॉकचेनचां वापर सुरू देखील केला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचल्यास त्याचा एकत्रित परिणाम फायदेशीर ठरू शकतो. बँकिंग, सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, सरकार, आरोग्य यामध्ये यांचा प्रभावीपणे वापर होणार आहे. नेमकी गरज आहे ती या तंत्रज्ञानाचा व्यापकपणे प्रचार करण्यासाठी. हे तितके सोपे नाही पण कठीणही नाही. भारत सरकारने सेमीकंडक्टर निर्मितीत जसा मोलाचा हातभार लावला आहे त्याचप्रमाणे युद्धपातळीवर ब्लॉकचेनचा वापर सुरू केल्यास भारत सुजलाम सुफलाम होण्यास फार काळ लागणार नाही.
ब्लॉकचेन ही तुलनेने नवीन तंत्रज्ञान असूनदेखील त्याचे विकेंद्रीकरण करणे हे देशासाठी आद्यकर्तव्य ठरणार आहे. मुख्यतः सायबर सिक्युरिटी सुरक्षेविरोधात हॅकर तंत्रज्ञानाला आव्हान देत असताना या मंडळीपासून चार हात पुढे शासन यंत्रणा राहिली पाहिजे ही माफक अपेक्षा आहे.अर्थात येणारा काळ मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मदत करेलच पण ब्लॉकचेन वापरण्यास सातत्य ठेवल्यास अनेक प्रशांची उत्तरे मिळत समस्येची उकल होण्यास मदत होणार आहे.