दिल्ली सरकारमधील मंत्र्यांना निवडणूक आयोगाची नोटीस!
05-Apr-2024
Total Views | 54
नवी दिल्ली : दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना यांना निवडणूक आयोगाकडून मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्षांकडून मंत्री आतिशी यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. या कायदेशीर नोटीशीवर निवडणूक आयोगाकडून उत्तर मागण्यात आले आहे. भाजपमध्ये प्रवेश न केल्यास अटक करण्याची धमकी दिल्याचे आतिशी यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटले होते.
#WATCH | Delhi: On ECI issuing notice to AAP leader Atishi, BJP MP and BJP North East Delhi candidate Manoj Tiwari says, "All her allegations were baseless. We warned her, but she did not apologise. We complained about this matter to the Election Commission. Now, the ECI has… pic.twitter.com/t8Lr9r0WKp
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांना दि. ०८ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या प्रकरणी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे. या वक्तव्याबाबत दिल्ली भाजपने आतिशी यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आली होती. आता सदर प्रकरणी निवडणूक आयोगाने दिल्ली सरकारच्या मंत्री, आप नेते आतिशी यांना नोटीस पाठवली आहे.
आतिशी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिल्याच्या दाव्यावरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपने त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता आतिशी यांना आयोगाने उत्तर देण्यासाठी ०८ एप्रिल २०२४ पर्यंत वेळ दिला आहे. “तुम्ही दिल्ली सरकारचे मंत्री आहात आणि राष्ट्रीय पक्षाचे नेते आहात. देशातील मतदार त्यांचे नेते सार्वजनिक व्यासपीठावरून काय बोलतात यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या विधानांचा निवडणूक प्रचारावर प्रभाव पडतो.”, अशा शब्दांत आयोगाने मंत्री आतिशी यांना खडसावले.
सदर प्रकरणावर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, भाजपकडून ४ एप्रिल २०२४ रोजी तक्रार प्राप्त झाली आहे. ही तक्रार आतिशी यांनी ०२ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या विधानावर करण्यात आली आहे. त्यांनी असा दावा केला होता की, त्यांच्या एका जवळच्या मित्राकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. भाजपमध्ये न आल्याने अटक झाल्याची चर्चा करण्यात येत होती.