भर सभेत नितीन गडकरींना भोवळ!

    24-Apr-2024
Total Views | 59
Nitin Gadkari

(Photo - Nitin Gadkari Twitter)
नागपूर : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील पुसत च्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आली. गडकरी मंचावरच बेशुद्ध झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कुठलेही कारण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय मंत्री गडकरींनी विशेष उपस्थिती दर्शविली होती. उन्हाच्या त्रासाने त्यांना भोवळ आली. यवतमाळच्या शिवाजी ग्राऊंडवर ही सभा सुरू होती. भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांना भोवळ आली, सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना सावरल्याने मोठा अनर्थ टळलाा


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121