उबाठा म्हणजे बाप नंबरी बेटा दस नंबरी : एकनाथ शिंदे
बुलडाणा : उबाठा म्हणजे बाप नंबरी आणि बेटा दस नंबरी, मुखात भवानी आणि पोटात बेईमानी, अशा प्रवृत्तींचा पराभव करण्याचे आवाहन शिंदेंनी केले. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी हा हल्लाबोल केले. ठाकरे मला नीच म्हणाले, हा माझा आणि माझ्या समाजाचा अपमान आहे, असेही शिंदे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद उपसभापदी नीलम गोऱ्हे, प्रतापराव जाधव, राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, किरण सरनाईक, श्वेताताई महाले, ज्योती वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, "आमचं व्यासपीठ जितकं मजबूत आहे, तसा समोर बसलेला महायुतीचा महासागर सगळ्या रेकॉर्ड तोडणारा असेल. काही दिवसांपूर्वी उबाठाची इथेच सभा झाली. त्यांना गेल्या निवडणूकीतील जनसागर आठवत असेल. आपसात मारामाऱ्या करुन ते लोकं हरतील आणि गळ्यात गळे घालून पायात पाय घालून पडतील आपल्याला काही करायची गरज नाही. बुलडाण्यात बाळासाहेबांची १९८९मध्ये बाळासाहेबांची झंजावती सभा झाली होती. त्यावेळी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या काँग्रेसला उखडून फेकून द्या, असे म्हणाले. त्यांचा सन्मान ठेवत मतदारांनी काँग्रेसला उखडून फेकून दिला आणि इथे भगवा फडकवत ठेवला. मात्र, आता काँग्रेसला कडेवर घेणाऱ्यांना तुम्ही जागा दाखवणार आहात ना?", असा सवालही त्यांनी विचारला.
"बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांना, तोंडात भवानी आणि पोटात बेईमानी करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवणार आहात ना?, असेही शिंदेनी विचारले. राम मंदिर असो, ३७० कलम असो हे बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपण त्यांच्यासोबत आहात ना?, असा सवाल उपस्थितांना केला. बाळासाहेब आम्हा तमाम शिवसैनिकांचे कुटूंबप्रमुख होते. तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचा वारसदार व्ह्ययचे होते. त्यांच्या विचारांना मूठमाती दिली. तुम्ही काँग्रेसला जवळ करुन जनतेचा विश्वासघात केला. त्यामुळेच आम्ही ही चूक सुधारण्याचे काम केले आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार सत्तेत आणलं.", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
"बाळासाहेबांनी वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे. हिऱ्यापोटी गारगोटी आणि सुर्यापोटी मेणबत्ती, अशा प्रकारचं काम ठाकरेंनी केलं, हे दूर्दैवं आहे. त्यामुळे उबाठात बाप एक नंबरी आणि बेटा दस नंबरी आहे. हा माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाचा अपमान आहे. माझ्या समाजाचा अपमान आहे. तुम्हाला एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाल्याचे हजम होत नाही. खरं म्हणजे हा माझा अपमान नाही, तमाम शेतकऱ्यांचा आणि गोरगरिबांचा अपमान आहे. याचं उत्तर हा समाजच येत्या २६ तारखेला निवडणूकीच्या पेटीतून देणार आहे," असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.