आयुर्वेदाची उत्पत्ती ही अथर्ववेदापासून झाली असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद असे देखील म्हटले आहे. थोडक्यात अनादी काळापासून आयर्वेुदाची परंपरा ही सार्वत्रिक सुरू असल्याचे विविध संदर्भ, आपल्याला प्राचीन वाङ्मयामध्ये दिसतात. रामायणदेखील त्याला अपवाद नव्हे. या लेखात जाणून घेऊया रामायणात दिसणार्या आयुर्वेदाशी निगडीत घटनांबद्दल..!
प्राचीन भारतीय साहित्य परंपरेत वेद, उपनिषद, अरण्यक, ब्राह्मण अशी खूप मोठी वैभवशाली परंपरा आहे. या संपूर्ण ग्रंथपरंपरेमध्ये केवळ रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांनाच ‘इतिहास ग्रंथ’ असे संबोधलेआहे. जरीही या दोन्ही ग्रंथांना महाकाव्य असे म्हटले जात असले; तरीदेखील प्रत्यक्षात हा काव्यस्वरूपात मांडलेला इतिहास आहे! थोडक्यात काय? तर रामायण असो वा महाभारत असो; त्या त्या काळात प्रत्यक्षात घडलेले आहेत. यातील सगळीच पात्रे ही कधी ना कधीतरी या आर्यवर्तात प्रत्यक्ष होऊन गेलेली आहेत. या दोन्ही ग्रंथांमध्ये आलेल्या वर्णनांना सत्यवर्णने म्हणून पाहिले पाहिजे. इतकेच नव्हे, तर याच बाबीमुळे आजच्या काळामध्येही वेगवेगळ्या पैलूंतून या दोन्ही ग्रथांचा धांडोळा घेतला जाऊ शकतो, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खगोलशास्त्र, भूगोल, कालशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वेशभूषा अशा विविध अंगाने रामायणाचा अभ्यास करता येईल. तसे प्रयत्नही यापूर्वी झाले आहेत.
असाच एक महत्त्वाचा पण अद्याप फारसे लक्ष न गेलेला पैलू म्हणजे रामायण आणि आयर्वेुद हा आहे. आयुर्वेदाची उत्पत्ती ही अथर्ववेदापासून झाली असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद असे देखील म्हटले आहे. थोडक्यात अनादी काळापासून आयर्वेुदाची परंपरा ही सार्वत्रिक सुरू असल्याचे विविध संदर्भ, आपल्याला प्राचीन वाङ्मयामध्ये दिसतात. रामायणदेखील त्याला अपवाद नव्हे. महत्त्वाची लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, रामायणकाळाच्या पूर्वीपर्यंत आयुर्वेदीय वैद्यांना भिषग या संज्ञेने ओळखले जाई. रामायणापासनू मात्र वैद्य ही परिभाषा रूढ झालेली आपल्याला दिसते. जी आजदेखील त्याचप्रकारे चालू असल्याचे प्रत्यक्षात पाहावयास मिळते. खरे तर ‘रामायण आणि आयर्वेुद’ या विषयावर स्वतंत्र ग्रंथ लिहून होईल, इतके सदंर्भ आहेत. पण प्रस्तुत लेखात केवळ काही ठळक मुद्द्यांच्या आधारे आपण या विषयाला स्पर्श करणार आहोत.
इंद्राची शस्त्रक्रिया :
वनातील ऋषी मनुींची यज्ञकर्म निर्विघ्नपणे पार पाडावीत या हेतूने आणि राक्षसांच्या संहाराकरता आपल्यासोबत राम लक्ष्मणाला घेऊन निघालेले विश्वामित्र ऋषी रामाला इंद्राबाबत ही कथा सांगतात की, इंद्राने अहल्येचा पातीव्रत्यभंग केल्याने गौतम ऋषींनी त्याला शाप दिला आणि त्याचे वृषण गळून पडले. त्यावेळी अश्विनीकुमारांनी त्याच्यावर शस्त्रक्रियेने बकर्याचे वृषण प्रत्यारोपित केले. हीच कथा यापूर्वी वैदिक वाङ्मयात देखील आढळते.
इन्द्रस्तु मेषवषृणस्तदाप्रभतिृति राघव।
गौतमस्य प्रभावेन तपसश्च महात्मन:॥
१.४९.१०
अवयव प्रत्यारोपणाचा हा एक आगळावेगळा संदर्भ आहे. आजच्या विज्ञानात याबाबत प्रयोग चालले असून अद्याप तरी यश मिळालेले नाही. येणार्या काळात याबाबतीत नेमके काय यश सपांदित होते हे बघणे रोचक ठरेल!
राजवैदय : आयुर्वेद शिकणार्या विद्यार्थ्याने इतका उत्तम शास्त्राभ्यास आणि कर्माभ्यास करावा की, त्याच्या कौशल्यामुळे साक्षात राजांचा वैद्य म्हणून त्यांना प्राचारण केले जावे- अशा प्रकारचे संदर्भ आयुर्वेदीय संहिता ग्रथांमध्ये अनेक ठिकाणी आढळतात. ‘राजवैदय’ या पदाला पूर्वी खपूच महत्त्व होते. आजही शासकीय व्यक्ती अथवा मोठ्या पदांवरील राजकीय नेत्यांच्या वैद्यांना तशाच प्रकारचा मान समाजामध्ये आढळतो. मग तो काळ तरी अपवाद कसा असेल बरे? दशरथ राजाच्या पदरी स्वतःच्या राजवैद्यांचा एक संघ होता; याचा संदर्भ आपल्याला रामायणात आढळतो.
सन्ति मेकुशला वैदयास्त्वभितुष्टाश्च सर्वशर्व ः॥२.१०.३०॥
सखिुखितां त्वां करिष्यन्ति व्याधिमाचक्ष्व भामिनी।
कैकेयीला विव्हळ झालेले पाहून राजा दशरथ म्हणतो, माझ्याकडे विविध क्रियांत निष्णात असे राजवैद्य आहेत. हे तुला तपासून योग्य ती औषधयोजना करतील. हे बोलताना दुर्दैवाने दशरथाला कैकेयीचा नेमका आजार आसूया आहे हे कळले नव्हते!
दशरथाचा मृत्यू:
काम, शोक आणि भय या मानसिक भावांनी शरीरातील वात वाढतो; असे आयुर्वेद सांगतो. दशरथ राजाच्या ठाई या तिन्ही भावनांनी खपूच मोठ्या प्रमाणामध्ये घर केले होते. रामायणाच्या वरील वर्णनांच्या पुढील सर्गांमध्ये सातत्याने दशरथाला दुःखाचे आवेग येऊन त्याचे भान हरपत असल्याचे आणि तो काही काळाकरता बेशुद्ध होत असल्याचे वर्णन आहे. त्याच्या सर्वांगाला कंप सुटून पुढे यातच त्याचा मत्ृयू झाला; असे वर्णन रामायणात आढळते. ही सारी लक्षणे आयुर्वेदानुसार मर्माभिघाताची आहेत. इतकेच नव्हे, तर आजच्या विज्ञानानुसार देखील हृदयविकाराचा झटका येण्यामागील सततचा शोक हे कारण आणि त्याची लक्षणे रामायणात नमूद केलेल्या दशरथ राजाच्या या लक्षणांची अतिशय मिळतीजुळती असल्याचे दिसते.
शव जपण्याची प्रक्रिया :
दशरथाचा मृत्यू झाला त्यावेळेला श्रीराम वनवासाकरिता निघाले होते, अशा परिस्थितीत त्याच्या अत्यंविधीसाठी राम परत येईपर्यंत दशरथाचे शव जपून ठेवणे गरजेचे होते. रामायणातील वर्णनानुसार औषधी सिद्ध तेेलाची द्रोणी तयार करून त्यामध्ये राजा दशरथाचे शव ठेवण्यात आले. सुश्रुतसहिंतेमध्ये विच्छेदनापूर्वी शव कशाप्रकारे जपावे आणि त्याची तयारी कशी करावी? याचे सविस्तर वर्णन आढळते. या सदंर्भाच्या आधारे शव जपण्याची शास्त्रीय पद्धत ही आयुर्वेदीय तज्ज्ञांना रामायण काळापासनू ज्ञात होती, असे आपल्याला निश्चितपणे सांगता येते.
वैद्यराज सुषणे :
आचार्य तलुसीदासांनी रामचरितमानसात सुषणे वैद्यांचा जरी ‘रावणाचे वैद्य’ असे म्हणनू उल्लेख केला असला तरी प्रत्यक्ष वाल्मिकीय रामायणात मात्र सुषेण हे वरूण देवांचे औरसपत्रु आणि वानरांचे वैद्य असल्याचा संदर्भ मिळतो. या वैद्यांची कामगिरी ही संजीवनी वनस्पतीच्या साहाय्याने लक्ष्मणाचे प्राणस्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेच; पण त्याहीपेक्षा एक वेगळा आणि सर्वार्थाने विशेष संदर्भ जो रामायणात मिळतो तो असा की, सुषेण वैद्यांनी ते सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना विद्युन्माली नावाच्या राक्षसाचा वध केला. थोडक्यात, एखाद्या सैन्याचा वैद्य हा केवळ वैद्यकीय सल्यापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात रणांगणावरदेखील पराक्रम गाजवत होता हे आपल्याला रामायणातील संदर्भातनू दिसून येते.
संजीवनी वनस्पती :
संजीवनी बटुी हा रामायणातील अतिशय प्रसिद्ध असलेला भाग आहे. मात्र, अनेकदा मूळ वाल्मिकीय रामायणाचा अभ्यास नसता; याची कथा पूर्णपणे आपल्याला ठाऊक नसते. राम रावण युद्धामध्ये एकूण तीन वेळा लक्ष्मण मूर्च्छित होण्याचे प्रसंग आले आहेत. यातल्या पहिल्या प्रसंगात इंद्रजिताने मारलेल्या नागपाशामुळे राम आणि लक्ष्मणबद्ध झाले आणि गरुडाने त्यांचे मुक्तता केली असा संदर्भ आढळतो. दुसर्या वेळी राम लक्ष्मणासह संपूर्ण सैन्यच इंद्रजिताची शक्ती लागनू मूर्च्छित झालं असा संदर्भ येतो. यावेळी जागतृ अवस्थेत असलेल्या जांबवतांने हनुमंताला हिमालयातनू संजीवनी वनस्पती आणण्याचा उपदेश केलेला दिसतो. त्याप्रमाणेच हनमुानाने तेव्हा संजीवनी आणल्याचा आणि तिचा उपयोग झाल्याचा संदर्भही रामायणात आढळतो. तिसर्यावेळी मात्र रावणाची शक्ती लागनू लक्ष्मण गतसंज्ञ झाल्यावर सुषेण वैद्य हे हनुमानाला जांबवतांने आधी सांगितलेली संजीवनी वनस्पती आणि त्याच्यासोबतच तीन महत्त्वाच्या अशा वनस्पती - ज्या प्राणभय उत्पन्न झाल्यावर प्राण वाचविणार्या असतात; त्या आणण्याबद्दल सुचवतात. या वनस्पतींची नावे विशल्यकरणी, सवर्णकरणी, संधानकरणी आणि मृतसंजीवनी अशी आढळतात.रुग्णाचे प्राण कंठात असेपर्यंत वैद्याने प्रयत्न करणे अनिवार्य आहे. असे आयुर्वेद सांगत असला तरी त्याआधी एखादी व्यक्ती जिवंत आहे अथवा मृत याची लक्षणे नीट तपासणे देखील अत्यावश्यक असते.
रामायणकाळात आजच्या आधुनिक शास्त्रानेदेखील संमत केलेल्या लक्षणांचा आधार घेत लक्ष्मण जिवंत असल्याचे सुषेण वैद्य सांगतात; तेव्हा ते वाचून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही! लक्ष्मणाचा वर्ण हा निष्प्रभ झालेला नाही, त्याचे शरीर अद्याप गरम आहे, त्याचे डोळे हे कमळाप्रमाणे विस्तीर्ण आणि सतेज आहेत. ही लक्षणे दिसत असल्याने तो केवळ मूर्च्छित आहे; पण मृत नाही असे वैद्यराज सुषेण श्रीरामांना सांगतात आणि हनुमंताला पुन्हा एकदा हिमालयात जाऊन संजीवनी घेऊन येण्यास सांगतात. संजीवनी आणल्यावर तिच्या रसाचे नस्य लक्ष्मणाला करण्यात आले म्हणजेच, तिच्या रसाचे थेंब त्याच्या नाकात सोडण्यात आल्याचा उल्लेख आहे. बेशुद्ध मनुष्याला मुखाने औषध पाजले जात नाही. नाकाची अतंस्त्वचा, डोळ्यांच्या आतला भाग अशा ठिकाणाहून किंवा जिभेखाली वा हिरड्यांना चोळून औषधे दिली जातात जेणेकरून त्यांचे शोषण लगेच व्हावे. रामायणातील हा उल्लेख आयुर्वेदाच्या या पद्धतीशी मेळ खाणारा आहे. इतकेच नव्हे, तर आजचे पाश्चात्य वैद्यकही अशा औषधी देण्याच्या विविध मार्गांबाबत सजग असल्याचे दिसते.
खरेतर ‘रामायणातील आयुर्वेद’ हा संदर्भासह एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे इतके संदर्भ जागोजागी वाल्मिकीय रामायणात आढळतात. विस्तारभयास्तव त्यातील केवळ ठळक संदर्भ वाचकांच्या समोर ठेवले आहेत. अयोध्येतील जन्मस्थानी अविरत संघर्षानंतर रामरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्याने यावर्षीची रामनवमी फारच अलौकिक ठरणार आहे. रामाच्या पूजेत आयुर्वेदाचे हे पुष्प नम्रपणे समर्पित करतो.
कल्याण करी रामराया!
वैद्य परीक्षित शेवडे
(लेखक आयुर्वेद वाचस्पती आहेत. )