शिवनेत्र बहिर्जी : शिवकालीन हेरखात्याच्या शौर्यगाथांची कादंबरी

    13-Apr-2024   
Total Views | 269

bahirji
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी मिळवलेले स्वराज्य आज आपण चार शतकांनंतरही मिरवतो. आपल्या राजांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी यांचे कौतुक करताना त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचे १२ मावळातले मावळे यांचे आपण तोंडभरून कौतुक करतो. परंतु, राजांना आक्रमणांचा सुगावा कसा लागत असे, याबाबत आश्चर्य व्यक्त करताना, मात्र हेरखात्यास आपण सपशेल विसरून जातो. या हेरखात्याविषयी लिखित आणि उपलब्ध माहिती फारच त्रोटक आहे. या खात्याविषयी काहीही माहिती उपलब्ध नसणे, हेच या खात्याचे यश आहे आणि म्हणूनच त्यांचे कार्य नाही, किमान कर्तृत्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने प्रेम धांडे या नवलेखकाने लिहिलेली ही रहस्यमय चित्तथरारक कादंबरी.
 
प्रेम धांडे म्हणतात की, ”वरून भव्यदिव्य दिसणारा हा इतिहासाचा समुद्र तेवढाच खोल आणि अनेक शौर्यगाथा लपवून बसला आहे. शिवरायांचे अदृश्य शक्ती बल म्हणजे त्यांचे हेर खातं; पण त्या हेरखात्याबद्दल मात्र फारच त्रोटक माहिती इतिहासात लिहिलेली आहे. अगदी कमी अभ्यास मुद्दे घेऊन, त्याच्याभोवती गोष्ट गुंफून ही कादंबरी तयार केली आहे.” त्यांच्या कर्तृत्वाविषयी सुरुवातीला प्रश्न मांडून, त्या प्रश्नांची उत्तर शोधत, या दोन्ही पुस्तकांची निर्मिती झाली आहे. पहिला खंड लिहिण्यासाठी लेखकाला सहा महिने अभ्यास करावा लागला. राजांच्या राजनीतीचं कौतुक करण्यासाठी, ही कादंबरी लिहिली असल्याचे लेखक म्हणतात. ‘शिवनेत्र बहिर्जी’ आकारास येण्यासाठी, बर्‍याच कलाकारांनी आपले योगदान दिले आहे. उत्कृष्ट आकर्षक मुखपृष्ठ आणि चित्र अजय हातेकर यांनी साकारली आहेत. मनातल्या कल्पनांना, रुपांना कागदावर चित्रांच्या रुपात त्यांनी उतरवले. डॉ. पल्लवी पाटील यांनी संहिता संपादन करून, लेखनातल्या त्रुटी संपादित केल्या आहेत, तर संजय वनकुंद्रे यांनी उत्कृष्टरित्या ग्रंथ संपादित केला आहे. सारद मजकूर यांनी पुस्तकाचे मुद्रितशोधन आणि अंतर्गत मांडणी केली.
 
पहिल्या खंडामध्ये सुद्धा कादंबरीचे विभाजन तीन भागांमध्ये केले आहे. पहिल्या भागात भोपाळगडी देह टेकला, राजांशी पहिली भेट, गुरू कान्होजी जेथे यांचे प्रथम दर्शन, दौलतरावाचे विजापूरकडे मार्गक्रमण, नावाड्याचा गुप्तहेर झाला, दौलतरावाचे बहिर्जी नाईक झाले, पत्नी शारदेला पाहण्याची ओढ, सारंगा स्वराज्य स्थापनेची शपथ अशा पाठांचा अंतर्भाव केला आहे. दुसर्‍या भागात विजापुरात पुनरागमन, पहिल्या युद्धाची चाहूल, कावेरी, फतेह खानाच्या सैन्यात प्रवेश, पहिला युद्धात स्वराज्याचा विजय, शहाजीराजांची सुटका, औरंगजेब ज्युमलाच्या मैत्रीचा भेद अशा कथांचा समावेश आहे. भाग तीनमध्ये सारंगाला वीरगती प्राप्त झाली, औरंगजेबाचे आदिलशाहीवर आक्रमण, श्रीगोंद्याच्या पेठेची पाहणी आणि जुन्नरची लूट असे चार भाग समाविष्ट केलेले आहेत.
 
‘बहिर्जी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि ती अवघ्या २० दिवसांत संपली! त्यानंतर प्रेमला दुसर्‍या भागाविषयी विचारणा सुरू झाली. खरेच आहे म्हणा, हेरखाते एक असं खात आहे, ज्याबाबत फारशी माहिती लोकांना नसते. तेव्हा अशी माहिती जगासमोर आणल्यावर, त्याबाबत उत्सुकता असतेच. त्या उत्सुकतेतून अगदी सात वर्षांच्या वाचकांपासून ते ७०च्या आजोबांपर्यंत सर्वांनी याबाबत विचारणा सुरू केली. पुढचा खंड फार संघर्षमय नसला, तरी त्यात चित्तथरारक घटनांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे.
 
या काळात बहिर्जी थोडासा मुरलेला होता. त्याची संघटना तयार झाली होती आणि स्वराज्याचा डोलाराही वाढला होता. पुस्तकाबाबत बोलताना प्रकाशक नवनाथ जगताप सांगतात की, ”महाराष्ट्राच्या अभूतपूर्व इतिहासात अगदी महत्त्वाचं पात्र, ज्याचा स्वराज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे, ते हेरखाते त्या हेरासारखेच काळाच्या ओघात गुप्त राहिले. लेखकाने प्रसंगांचा अंदाज घेत, इतिहासाचा मागोवा घेताना, त्याच्या कल्पनाशक्तीचा योग्य उपयोग करत, ही कादंबरी लिहिली आहे. ऐतिहासिक संदर्भ नसले, तरी कल्पनाशक्तीच्या जोरावर इतिहासाबद्दल आपली मते मांडली आहेत.
 
दोन्ही पुस्तकांच्या सुरुवातीला अनुक्रमणिकेच्या आधी प्रमुख व्यक्तिरेखांचा उल्लेख केल्यामुळे, पुस्तक वाचताना सुलभ जाते. तीन भाग नसले तरी एकाच भागात विस्तारित पट मांडला आहे. एकूण १४ पाठांपैकी पहिला जंजिरा त्यानंतर मुघल तक्तपटावरची भनक, सिद्धीवर जरब, अफजलखान, संभाजीराजांचे प्रथम दर्शन, महामोहिमेची खबर, तो येत आहे, पंढरपूर तुळजापूरचे रक्षण, शेवटी मासा जाळ्यात अडकलाच, मोठ्या पहाडाला केले उद्ध्वस्त, सिद्धी जोहर, दुहेरी संकट, शाहिस्ताखान, शास्त्र, सुरत अशा अनेक पाठांचा समावेश आहे. वाचताना वाचकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही कादंबरी संपूर्णपणे लेखकाच्या कल्पनाविस्तार असल्याने, या कथेत वापरली गेलेली नावं, चरित्र, स्थळ यांना काल्पनिक रूप देऊन त्यांचं नामांतर करण्यात आलं आहे. परंतु, या सर्वांच्या आधारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती महाराजांच्या हेरखात्याच्या कार्याचा वेध घेतला आहे.
 
पुस्तकाचे नाव : शिवनेत्र बहिर्जी खंड-२
लेखकाचे नाव :प्रेम धांडे
प्रकाशन :रुंद एंटरप्रायजेस
पृष्ठसंख्या : ३३०
मूल्य : ४४९ रु.
 
पुस्तकाचे नाव : शिवनेत्र बहिर्जी खंड-१
लेखकाचे नाव : प्रेम धांडे
प्रकाशन : रुंद एंटरप्रायजेस
पृष्ठसंख्या : ३००
मूल्य : ३९९ रु.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा
प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

प.बंगालमधील मालदानंतर आता मुर्शिदाबादमध्ये वादंग, अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांकडून समज

Marshidabad प. बंगालच्या मालदा जिल्ह्यानंतर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदामध्ये एका हिंसेला घेईन पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीआहे. पोलिसांनी एक्स ट्विटर लिहिले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नौदात मोठा उपद्रव झाला. ज्यात हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच काही हिंदूंच्या शेतांचे, पिकांचे नुकसान करण्यात आले आणि तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ६ लोकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पोलीस शोधमोहिमेवर आहेत. ..

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला संस्कृतीचा महाकुंभ स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत ठाणेकरांनी अनुभवला "संस्कृतीचा महाकुंभ" स्वागतयात्रेत सर्वधर्मीयांचा उत्साह

Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार ..

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदू नववर्ष शोभायात्राचे आयोजन

Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी ..

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121