मुंबई : प्रभाग क्रमांक १७३ येथील कै. अशोक पिसाळ मैदानात नुकतेच कोकण महोत्सवयाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण महोत्सव संपूनदेखील सदर मैदानातील सामान कंत्राटदारांकडून हटविण्यात आले नव्हते. त्यामुळे येथील खेळाडूंना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती.
दरम्यान, मैदान खेळण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल जाधव यांनी महापालिकेच्या मैदान विभाग अधिकारी यांच्या चर्चा करून निवेदन दिले होते.
सदर विषयाबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मैदानात कंत्राटदरांकडून ठेवलेले सामान हटविण्यात आले आहे, याची खात्री राहुल जाधव यांना दिली. यामुळे येथील खेळाडूंनी खेळण्यासाठी मैदान मोकळे झाल्याने राहुल जाधव यांचे आभार मानले आहेत.