समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा दिलासा
मुंबई : दिल्ली हायकोर्टाने अखेर समीर वानखेडे (
Sameer Wankhede) यांना दिलासा दिला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी वानखेडेंनी शाहरुखक़डून २५ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा वानखेडेंवर (Sameer Wankhede) सीबीआयने दाखल केला होता. या संबंध प्रकरणाचा अंतर्गत तपास ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे देण्यात आला होता, मात्र, दिल्ली हायकोर्टाने ज्ञानेश्वर यांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ज्ञानेश्वर यांनी सादर केलेले पुरावे वानखेडेंविरोधात (
Sameer Wankhede) वापरता येणार नसल्याचे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. न्यायाधीश रेखा पल्लई आणि शैलेंद्र कौर यांच्या खंडपीठाने हा महत्वपुर्ण निर्णय दिला.
हे वाचलंत का? - शाहरुख खानचा 'तो' डायलॉग 'रोडसाईड टाईप'! समीर वानखेडे संतापले!
दरम्यान, समीर वानखेडेंच्या बाजूने हा निर्णय दिल्यानंतर त्यांची पत्नी क्रांती रेडकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले आहे की, “विजय हा सत्याचाच होणार. पुन्हा सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते! मी नेहमीच तुझ्यासोबत असेन”.
नेमकं प्रकरण काय?
२०२१ साली समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. परंतु, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ही कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप केला होता, ज्यामुळे एनसीबीच्या विशेषत: समीर वानखेडेंच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. काही काळानंतर एनसीबीकडून या प्रकरणाचा अंतर्गत तपास ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यावेळी ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईची चौकशी करत बऱ्याच त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. आणि चौकशीअंती ज्ञानेश्वर सिंह यांच्या या अहवालामुळे आर्यन खान निर्दोष असल्याचे सिद्ध होण्यास मदत झाली होती.