चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणींसाठी आनंदाची बाब! विसापूरमध्ये SNDT महिला विद्यापीठाचे भूमिपूजन

    13-Mar-2024
Total Views | 94

SNDT Chandrapur


चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे नव्याने सुरू होणारे SNDT महिला विद्यापीठाचे केंद्र जिल्ह्यातील महिला व तरुणींसाठी आनंदाची बाब आहे. यामुळे महिला शिक्षणाला चालना मिळेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहे. मंगळवार, १२ मार्च रोजी विसापूर येथे SNDT महिला विद्यापीठाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "चंद्रपूरला आजही ‘चांदा’ या नावाने ओळखले जाते. आज येथे १६६७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे. येथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे जिल्ह्यातील महिला व तरुणींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होणार आहे."
ते पुढे म्हणाले की, "सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी चंद्रपूरला लाभले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण शक्तीनिशी करणारे ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत. गतकाळात अर्थमंत्री तसेच यावेळी वनमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खाते व सांस्कृतिक खाते बहरले आहे. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या सुधीरभाऊंनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली आहे. आता विद्यापीठाद्वारे जिल्ह्यातील महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देत आहेत," असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
यावेळी बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "वाघाच्या प्रेमापोटी या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते SNDT महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन पार पडले. यामुळे जिल्ह्यातील महीलांना रोजगाराची व स्वयंरोजगाराची मोठी संधी प्राप्त होणार असून कौशल्य शिक्षण मिळेल. तसेच विद्यापीठाला ५९० कोटी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले.
हे वाचलंत का? - CAA विरोधातही ओकली उद्धव ठाकरेंनी गरळ!
 
यावेळी मंचावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, डॉ.जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. रूबी ओझा, डॉ विलास नांदवडेकर, संचालक डॉ. राजेश इंगोले आदी उपस्थित होते.
 
ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे ५० एकर जागेवर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे पाठबळ विद्यापीठाला लाभले. सोबतच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही या प्रकल्पास मोलाची मदत झाली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी ही माहिती दिली.
 



अग्रलेख
जरुर वाचा
नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

नागपूरात हिंसाचार कसा घडला? जाणून घ्या सपूर्ण घटनाक्रम...

दिवस होता सोमवार. रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील काही भागात अचानक हिंसाचार उसळला. दोन गटात हाणामारी, दगडफेक, वाहनांची जाळपोळ या सगळ्या घटनांनी नागपूर हादरलं. एवढंच नाही तर जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तरीसुद्धा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशीरापर्यंत जमाव पांगवत हा हिंसाचार शांत केला. मुख्य म्हणजे हा सगळा प्रकार घडला तो म्हणजे कायम वर्दळ असलेल्या महाल परिसरात. सध्या नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आलीये. मात्र, या घटनेची सुरुवात नेमकी कशी झाली? ..