आशा भोसलेंची नात जनाई चंदेरी दुनियेत पदार्पणासाठी सज्ज!

    12-Mar-2024
Total Views | 36
पद्मविभूषण आशा भोसले यांची नात जनाई आनंद भोसले हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.
 

zanai bhosle 
 
मुंबई : संगीत क्षेत्र मंगेशकर कुटुंबियांशिवाय परिपुर्ण होऊ शकत नाही. भारतरत्न लता मंगशेकर ते पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आपल्या गायकीने भारतीय संगीत विश्व समृद्ध केले आहे. आजही वयाच्या ९०व्या वर्षी आशा भोसले यांच्यात उर्जा दिसून येते. याच घराण्याचे नाव आता मनोरंजन क्षेत्रात पुढे नेण्यासाठी आशा भोसले यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) सज्ज झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या ऐतिहासक पटांच्या लाटेपैकी एका ऐतिहासिक चित्रपटात जनाई भोसले (Zanai Bhosle) महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच तिच्या (Zanai Bhosle) नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान
 
निर्माते आणि दिग्दर्शनाची सुरुवात करणारे संदीप सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘द प्राइड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाची घोषणा केली. या ऐतिहासिकपटातून जनाई पदार्पण करणार असून ती शिवछत्रपतींच्या पत्नी महाराणी सईबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
 
आजवर ‘अलीगढ’, ‘सरबजीत’, ‘झुंड’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘मैं अटल हूं’, या चित्रपटांची निर्मिती करणारे संदीप सिंह 'द प्राइड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. दरम्यान, आशा भोसले यांच्या उपस्थितीत संदीप यांनी घोषणा करत या चित्रपटात जनाईला सईबाईंच्या भूमिकेसाठी निवडले. ही सुखद बातमी ऐकताच जनाईने संदीप यांना अभिवादन करत आपल्या आजीच्या आशा भोसले यांच्या पायावर डोकं ठेवताना तिच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
 
हे वाचलंत का? -  ९० व्या वर्षीही आशा भोसले गाजवणार श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य!
 
दरम्यान 'द प्राइड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज' हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी प्रदर्शित केला जाईल. इमर्सो स्टुडिओ आणि लीजेंड स्टुडिओज यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून अजून तरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार हे गुलदस्त्यात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121