(Dr. Mohanji Bhagwat)
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत गेले काही दिवस लातूर व जालनाच्या प्रवासावर होते. गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील 'श्री क्षेत्र सरला बेट' यास भेट दिली. मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरसंघचालकांनी पूज्य संत गंगागिरीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शनही घेतले.
येथे उपस्थित महंत रामगिरीजी महाराज यांनी सरसंघचालकांना तीर्थक्षेत्राची माहिती दिली. तीर्थक्षेत्र परिसरात सरसंघचालकांनी एक तुळशीचे रोप लावल्याचेही दिसले. तसेच २०० वर्षांची अखंड परंपरा असलेली पवित्र वीणा त्यांनी धारण केल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी उपस्थित पूज्य संतांशी संवाद साधला.