मुंबई : ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर ऑडीटोरीयम आयोजित करण्यात आला आहे, सदर सोहळ्यात कला, नृत्य व विविध पुरस्कारांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमात अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ.गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष डॉ आनंद पेडणेक्कर युवा प्रमुख विशाल कडणे आणि सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, धनश्री काडगावकर, शेखर फडके यांना आमंत्रित केले आहे.
सदर कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे आणि मुंबई बँक अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमात अभिनेते मोहन जोशी, सविता मालपेकर, सुहास परांजपे, धनश्री काडगावकर, निमिष कुलकर्णी, विकास चव्हाण, शेखर फडके, मयुर वैद्य, हर्षिता हाटे यांचा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
तरी सर्व समाजबांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी , अशी विनंती युवा प्रमुख विशाल कडणे यांनी केली आहे.