देवेंद्र फडणवीस ३.० : महाराष्ट्रात 'देवेंद्र'पर्वाचा पुन्हा आरंभ

    04-Dec-2024
Total Views | 45
 
devendra fadnavis  
 
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...,  मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच चाणाक्ष, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला फडणवीसांच्या रुपाने लाभला. जाणून घेऊयात त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी...  

देवेंद्र फडणवीस परिचय
  • संपूर्ण नाव - देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
  • जन्म दिनांक : २२ जुलै १९७०
  • वय : ५४
  • पत्नी : अमृता फडणवीस
  • मुलगी : दिविजा फडणवीस
  • शिक्षण: नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण. व्यवस्थापन शास्त्राची पदवी. 'डीएसई बर्लिन' या जर्मनीतील संस्थेतून 'डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट' ही पदव्युत्तर पदवी प्राप्त.  
राजकीय टप्पे
 
  • १९८९ वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो
  • १९९० पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
  • १९९२ अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९२ ते २००१ सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर. मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव.
  • १९९४ प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • १९९९ ते आतापर्यंत सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
  • २००१ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • २०१० सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २०१३ अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
  • २०१९ ते २०२२ विरोधी पक्षनेते
  • २०२२ ते २०२४ उपमुख्यमंत्री
 
devendra fadnavis
 
विधिमंडळातील कार्य
 
अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास आणि गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती
 
devendra fadnavis
 
सामाजिक योगदान
 
  • सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन
  • संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
 
devendra fadnavis
 
आंतरराष्ट्रीय ठसा
 
  • १९९ मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
  • २००५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स
  • २००६ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी - युनेस्को - डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
  • नमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ - ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन - इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
  • २००७ मध्ये डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व
  • २००८ मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट - वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर
  • २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य
  • २०१० मध्ये मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • २०११ मध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग,
  • २०१२ मध्ये मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग
  • २०१२ मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
 
devendra fadnavis
 
पुरस्कार
 
  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन २००२-२००३ चा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
  • मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
devendra fadnavis
 
मुख्यमंत्री कार्यकाळातील परदेश दौरे
 
  • २१ ते २५ जानेवारी २०१५ आणि २१ ते १५ जानेवारी २०१८ - दावोस (स्वित्झर्लंड) - वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी.
  • १२ ते १६ एप्रिल २०१५ - जर्मनी हॅनोव्हर मेसी परिषदेसाठी.
  • २६ ते २९ एप्रिल २०१९ - इस्राईल
  • १४ ते १८ मे २०१५ - चीन
  • २९ जून ते ६ जुलै २०१५ आणि १९ ते २२ सप्टेंबर २०१६ - अमेरिका
  • ८ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१५ - जपान
  • १२ ते १६ नोव्हेंबर २०१५ - लंडन
  • ९ ते १४ जुलै २०१६ - रशिया
  • २६ ते २९ सप्टेंबर २०१७ - दक्षिण कोरिया-सिंगापूर
  • ११ ते १४ ऑक्टोबर २०१७ - स्वीडन एक्स्पोसाठी
  • ९ ते १६ जून २०१८ - दुबई, कॅनडा, अमेरिका
 
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..