मौलाना साजिद रशिदीवर गुन्हा दाखल करा : अनिकेतशास्त्री

    03-Dec-2024
Total Views |
Aniketshastri

नाशिक : हिंदू देव-देवतांवर खालच्या पातळीवर टीका करुन हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल मौलाना साजिद रशिदी याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे महंत तसेच ‘अखिल भारतीय संत समिती’, धर्म समाज महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे ( Aniketshastri ) यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे पत्र उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सपकाळे यांना सोमवार, २ डिसेंबर रोजी देण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर वाचाळवीर मुस्लीम धर्मगुरु मौलाना साजिद रशिदी याने हिंदू देवींवर हिंदू समाज पूजा करून बलात्कार करतो, अशाप्रकारचे उद्गार काढत हिंदू धर्माच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले. रशिदीकडून समस्त हिंदूंचा घोर अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे या तथाकथित मौलानावर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. यापुढे कोणीही असे समाज विघातक वक्तव्य करणार नाही. दोन्ही समाजामध्ये मौलाना साजिद रशिदीकडून भांडणे लावण्याचे काम सुरु असून, दोन्ही समाजामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्रकार असल्याचे अनिकेतशास्त्री यांच्याकडून पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन वाचाळवीर मौलाना साजिद रशिदीवर तत्काळ गुन्हा दाखल केला जावा. अन्यथा संत समाजाकडून उपोषणाला बसण्याचा इशारा ‘संत सेवा समिती’कडून पत्राद्वारे देण्यात आला आहे.

हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम

अशाप्रकारचे वक्तव्य करुन देशातील शांतता एकप्रकारे भंग करणे हा एकप्रकारच्या षडयंत्राचाच भाग आहे. मौलाना साजिद रशिदीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का, याचाही तपास करण्यात आला पाहिजे. समाजा समाजामध्ये दंगली घडविण्याचा यामागे उद्देश आहे का? याचाही तपास करण्यात आला पाहिजे. रशिदीचे हे बोलणे खूपच दुर्दैवी आहे. असे वक्तव्य करुन समस्त हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम करण्यात आले आहे. शासनाने असे वक्तव्य करणार्‍या मौलानावर कठोर कारवाई करावी. तरच हिंदू देव-देवतांवर वक्तव्य करणार्‍यांना चपराक बसेल.

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज