नागपूर : (Eknath Shinde) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीस भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"दीक्षाभूमीवर आल्यावर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते"
"इथं आल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. नागपूरची दीक्षाभूमी असो मुंबईची चैत्यभूमी असो, या दोन्ही श्रद्धा आणि आदर्शाच्या भूमी आहेत. या ठिकाणी आल्यावर एक वेगळी अनुभूती मिळते. म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने चैत्यभूमीच्या बाजूला असलेल्या इंदू मिल्सच्या जागेत बाबासाहेबांचे भव्यदिव्य जागतिक दर्जाचे स्मारक करत आहोत. जगाला हेवा वाटेल असं स्मारक आपण उभारतोय याचा अभिमान आहे." असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.