'संगीत मानापमान'मधील एक सुरेल गाणं भेटीला, शंकर महादेवन-बेला शेंडेंनी चढवला स्वरांचा साज
20-Dec-2024
Total Views | 35
मुंबई : वसंत ऋतुच्या सौंदर्याने आणि मोहकतेने संगीत मानापमान चित्रपटालाही भूरळ घातली आहे. या चित्रपटात वसंत ऋतूच्या उत्सवाला साजर करणारं ऋतु वसंत हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुबोध भावे, वैदेही परशुरामी सोबत गायक शंकर महादेवन आणि बेला शेंडे ही या बहारदार गाण्यावर थिरकताना दिसले आहेत.
या गाण्याचे बोल समीर सामंत यांनी लिहिले असून शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले आहे. आगामी मराठी संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी संगीतबद्ध केली असून १८ नामवंत गायकांनी ती गाणी गायली आहेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.