देशविरोधी आघाडीचा पराभव करायलाच हवा! : योगी आदित्यनाथ
अमरावती मध्ये धडाडली योगींची तोफ
07-Nov-2024
Total Views | 37
"छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे प्रतीक बनले पाहिजे." असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ६ नोव्हेंबर रोजी अमरावती इथल्या प्रचारसभेत योगींची तोफ धडाडली. महायुतीचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारादरम्यान योगींनी विरोधकांवर निशाणा साधला.
गुरूकुंज मोझरी येथे आपल्या भाषणाची सुरूवात योगी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करून केली. महाराष्ट्राच्या पवित्र माती मध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वास योगींनी व्यक्त केला. या प्रचारसभेत बोलताना योगी यांनी महाराष्ट्रात वाढलेला धार्मीक आणि जातीय तणावावर भाष्य केलं. याला काँग्रेस जबाबदार असल्याची टिका सुद्धा त्यांनी केली. काँग्रेसने हिंदू समाजात केवळ फूट पाडण्याचे काम केलं आहे असं सुद्धा योगी म्हणाले. काँग्रेसने वारंवार विघाताक कृत्यं केली असून या देशविरोधी आघाडीचा पराभव करायलाच हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं.
एकच धर्म - राष्ट्रधर्म
राष्ट्रधर्म या विषयावर आपले विचार मांडताना योगी आदित्यनाथ म्हणाले "मी राष्ट्रधर्माचा विचार यासाठी मांडत आहे कारण ज्या वेळेस आपल्याकडे धार्मीक यात्रा निघत असतात त्या वेळेस काही लोकांना या यात्रेकडे बघूण गर्व वाटत नाही. उलट, पाकिस्तानचा झेंडा मिरवण्याची इच्छा होते. भारत आज जगाच्या पाठीवर महासत्ता होण्याकडे वाटचाल करतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक भारत श्रेष्ठ भारत असा नारा दिला जातो आहे. याच वेळेस काही लोकं मात्र पाकिस्तान आणि फिलीस्तीन साठी मगरीचे अश्रू ढाळत आहेत. त्यांना संदेश देण्यासाठी आज मी इथे आलो आहे. आपल्या देशात केवळ एकच धर्म असायला हवा आणि तो म्हणजे राष्ट्रधर्म. याच राष्ट्रधर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. याच राष्ट्रधर्मासाठी जिजाऊ माँ साहेबांनी प्रेरणा दिली होती. तानाजी मालुसरे यांनी रक्त सांडलं होतं. छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिले होतं. हा महाराष्ट्र धर्म इथून भारतभर पसरला होता."
अमरावती मधल्या तेओसा मतदारसंघात भाजपचे राजेश वानखेडे विरूद्ध काँग्रेसच्या यशोमती ठाकूर असा सामना रंगणार आहे