वसई रोड येथे नवीन बाह्य टर्मिनसची योजना

केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा

    30-Nov-2024
Total Views |

vasai road

मुंबई, दि.३०: प्रतिनिधी 
पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रात वसई रोड येथे नवीन बाह्य टर्मिनसची योजना आखली आहे. वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसद्वारे हाताळल्या जाणाऱ्या बाहेरच्या गाड्यांचा भार कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. अखेर वसई रेल्वे टर्मिनलची मागणी मान्य करण्यात आली आहे, ही घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
पश्चिम रेल्वेने २०१३ मध्ये वसई रोड येथे टर्मिनस बांधण्याचा पहिला प्रस्ताव दिला होता, ज्याची योजना प्रत्यक्षात आली नाही. २०१७मध्ये पुन्हा हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. यावेळी वसई रोडवरील टर्मिनस २०२३ पर्यंत तयार करण्यात येणार होते. मात्र हा प्रकल्प काही कारणास्तव रखडला. नव्याने उभारण्यात येणाऱ्या टर्मिनसमध्ये चार प्लॅटफॉर्म, बाहेरच्या गाड्यांसाठी तीन स्टॅबलिंग लाइन, नवीन टर्मिनस इमारत असेल. नवीन प्रस्तावित राजधानी एक्स्प्रेस आणि इतर २० प्रवासी गाड्यांसह प्रीमियम गाड्या या सुविधेतून निघतील आणि समाप्त होतील.