" जनतेचा हा कौल.." सुप्रिया सुळे यांचे ट्विट चर्चेत

    24-Nov-2024
Total Views | 559

ssule


मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि जनतेने महायुतीला कौल दिला. भाजप सहीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला बहुमत मिळालेले आहेत. महाविकास आघाडीला जनतेने नापसंती दर्शवली असून, मविआचा साफ पराभव झाला आहे. अशातच आता जनतेचा हा कौल आम्हाला मान्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आपल्या X हँडल वर पोस्ट शेअर करत त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू असे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्याच बरोबर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांचे सुद्धा सुप्रिया सुळे यांनी आभार व्यक्त केले, त्याच सोबत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले.

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121