मीरा भाईंदरमध्ये तिरंगी लढतीत भाजपची सरशी

भाजपचे नरेंद्र मेहता ६० हजाराच्या मताधिक्याने विजयी

    23-Nov-2024
Total Views | 77
Narendra Mehta

ठाणे / मीराभाईंदर : निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या काही तास आधी भाजपाने उमेदवारी जाहीर करून निवडणूकीच्या मैदानात उतरवलेल्या नरेंद्र मेहता ( Narendra Mehta ) यांनी पक्षाचा विश्वास सार्थ करून दाखवला. मेहता यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मुजफ्फर हुसैन यांचा ६० हजार ४३३ च्या मताधिक्याने पराभव मीरा भाईंदरमध्ये भाजपाचा झेंडा रोवला. भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जय श्रीराम च्या घोषणा देत जल्लोष केला.

उमेदवारी मिळाल्यापासुन प्रचाराचा वेग वाढवत नरेंद्र मेहता यांनी झंझावात सुरू केला होता. उत्तर प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच देशभरातील अनेक मान्यवर नेते यांनी मीरा-भाईंदर शहरात जाहीर सभा घेतल्या होत्या. प्रचारात आघाडी घेतल्यानंतर त्यानी मतांची आघाडी सुध्दा घेतली होती. मतमोजणीमध्ये सुरूवाती पासूनच आघाडी घेत व ती कायम ठेवत अखेरच्या २५ व्या फेरीत त्यांनी १ लाख ४४ हजार ३७६ मते मिळवून महाविकास आघाडीचे उमेदवार मुजफ्फर हुसैन यांचा ६० हजार ४३३ मतांनी पराभव करून विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या माजी आमदार गीता जैन यांना २३ हजार ०५१ मतांवर समाधान मानावे लागले.

मिळालेली मते:

नरेंद्र मेहता: १ लाख ४४ हजार ३७६

मुझफ्फर हुसेन: ८३ हजार ९४३

गीता जैन: २३ हजार ०५१

अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121