आमचा अपेक्षाभंग झाला : आदित्य ठाकरे

पुन्हा फेक नरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न! पराभवाचं खापर फोडलं ईव्हीएमवर!

    23-Nov-2024
Total Views | 501
Aditya Thacheray

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. आदित्य ठाकरेंनी ( Aditya Thacheray ) मात्र, आपला वरळी हा मतदार संघ अवघ्या आठ हजार मतांनी राखला आहे. निवडणूकीच्या विजयानंतर त्यांनी निकालासंदर्भात प्रतिक्रीया दिली. "आजच्या निकालाने आमचा अपेक्षाभंग झाला. आता यात ईव्हीएमने किती प्रचार केला, ते पहावं लागणार आहे," असे म्हणत त्यांनी निकालाचे खापर ईव्हीएमवर फोडले.

आम्हाला अपेक्षित असा निकाल लागला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. "महाराष्ट्राने मतदान केलंय की, ईव्हीएमने केलंय?", असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थापनावरच शंका घेतली.

"अपेक्षित असा निकाल लागला नसला तरी तो मान्य करुन पुढे चाललो. प्रचार नक्की कोणी किती केला? ईव्हीएमने किती केला हे पाहिले पाहिजे" असेही ते म्हणाले. "मविआमधील दिग्गज नेते पराभूत झाले जे सोबत उभे राहतील असं वाटत होतं, त्यामुळे यावर चर्चा केली पाहिजे" असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील

देशातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवरील 'वक्फ'चा मालकी हक्क संपणार!

Waqf Board Property : देशात २५६ राष्ट्रीय स्मारके अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हींची दुहेरी मालकी आहे. परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा संपुष्टात येणार असल्याची माहिती एएसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती संग्रहित केली आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121