श्रीसिद्धिविनायक मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांचा विश्वास
18-Nov-2024
Total Views |
मुंबई : राज्यातील मुंबई येथील दादरस्थित असलेले श्रीसिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्र आणि हिंदूंचे आराध्य दैवत आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची आन बाण शान असल्याने श्री सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्ड दवा करणार नाही., असे प्रतिपान श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी केले आहे. याप्रकरणची माहिती त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यांचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांवर, मंदिरावर दावा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच मुंबई येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डानेही दावा केल्याचे खोटे वृत्त असल्याची माहिती आता पवन त्रिपाठी यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. ते म्हणाले की, दादरस्थित असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिरावर केवळ देशाच नाहीतर जगात राहणाऱ्या सनातनी असणाऱ्यांची एक श्रद्धा आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर ही मुंबईची आन, बाण आणि शान आहे. यामुळे श्रीसिद्धिविनायक मंदिरावर कोणीही दावा करणार नाही, असे पवन त्रिपाठी यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
WAQF board has claimed Siddhi Vinayak Temple in Mumbai.
दरम्यान राज्यात आणि देशात वक्फने हिंदू धर्मस्थळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावर दावा केला आहे. मध्यंतरी विशाळगडावर वक्फने दावा केला असून यावर अद्यापही वाद सुरूच आहे. यावेळी अनेक हिंदूंनी विशाळगडावर जाऊन या लॅण्ड जिहादचा विरोध दर्शवला होता. एवढेच नाहीतर काही दिवसांआधी आहिल्यानगर जिल्ह्यातील मडी येथील कानिफनाथ मंदिर आणि मंदिराच्या आसपास असलेल्या एकूण ४० एकर जागेवर वक्फने दावा केला आहे. देशात रेल्वे क्षेत्र सोडले तर सर्वाधिक मालमत्ता ही वक्फची असल्याची माहिती आहे.