सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 'इतक्या' जागांसाठी जाहिरात निघणार!

    06-Oct-2024
Total Views | 220
government bank job vacancy


मुंबई :    स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)मध्ये बंपर भरती केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात एसबीआयकडून बँकिंग सेवांचा विस्तार केला जाणार आहे. या माध्यमातून देशभरात ६०० नवीन शाखा कार्यरत करण्याचा विचार करण्यात येत आहे. एसबीआयकडून १० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

दरम्यान, एसबीआय नव्या भरतीच्या माध्यमातून १० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. एसबीआयने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १०,००० जागांकरिता नवीन भरती करण्याची घोषणा केली आहे. सर्वसाधारण बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी ही भरती केली जाईल. बँकेने आपले डिजिटल सेवा सक्षम करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

बँकेने अलीकडेच १,५०० तंत्रज्ञान तज्ज्ञांची भरती केली असून यामध्ये डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट आणि नेटवर्क ऑपरेटर या तांत्रिक नोकऱ्यांसाठी भरती करण्यात आली आहे. बँक तांत्रिक आणि सामान्य बँकिंग अशा दोन्ही बाजूंनी आमचे कर्मचारी बळकट करत आहोत, असे एसबीआय अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी सांगितले.


कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासावरही भर

बदलते तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या नवीन गरजांनुसार एसबीआय आपल्या विद्यमान कर्मचाऱ्यांना सतत प्रशिक्षण देत असल्याची माहितीही शेट्टी यांनी दिली. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सर्व स्तरांवर नवीन कौशल्ये प्रदान करत आहोत जेणेकरून ते ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील, असेही ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121