पुणे : ( MAHA NGO Federation ) महा एनजीओ फेडरेशनने आयोजित "आत्मनिर्भर दिवाळी 2024" उपक्रमांतर्गत पुण्यातील बुधवार पेठ येथे विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात ९० एचआयव्ही बाधित महिलांना पोषण आहार तसेच दीपावली स्वीट बॉक्सचे वाटप करण्यात आले. क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनीच्या CSR माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून आणि महा एनजीओ फेडरेशनच्या पुढाकाराने समाजातील विविध घटकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ५००० गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचणार असून निराधार, आदिवासी, पारधी समाजातील विद्यार्थी, मतीमंद, रस्त्यावरील भिकारी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींनाही लाभ मिळणार आहे.
महा एनजीओ फेडरेशन समाजातील महत्वपूर्ण अशा २५ पेक्षा अधिक विषयावर कार्यरत आहे. महा एनजीओ फेडरेशनच्या महाराष्ट्रभर २५०० पेक्षा अधिक एनजीओ संस्था सदस्य म्हणून कार्यरत आहेत आत्मनिर्भर दिवाळी उपक्रम अंतर्गत आपण दिवाळीचे निमित्त ५० पेक्षा अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे . मा. कृष्णकुमारजी बुब सर यांनी केलेल्या मदतीमुळेच सदर सेवाकार्य सहजरीत्या शक्य झाले आहे. महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने शेखर मुंदडा यांनी क्लीन सायन्सचे आभार मानले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी सेवा संकल्पच्या पदाधिकारी स्नेहा कलंत्री, किरण जाखोटिया, ज्योती मालपाणी, सरोज लद्दर, संध्या शाह, संगीता आगरवाल, मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट आणि अपूर्वा करवा व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक कविता सुरवसे यांनी केले
महा एनजीओ फेडरेशनचे वरिष्ठ संचालक मुकुंदजी शिंदे, संचालक अमोल उंबरजे, कैलास सिकची, राहुल जगताप, रवींद्र चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.