केंद्रीय अर्थमंत्र्यानी घेतली जागतिक बँकेच्या अध्यक्षांची भेट; बहुपक्षीय विकास बँकादी विषयांवर चर्चा

    24-Oct-2024
Total Views |
finance-minister-met-world-bank-president


मुंबई :     केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. जागतिक बँक अध्यक्ष अजय बंगा यांची भेट घेत अर्थमंत्र्यांनी बहुपक्षीय विकास बँकांमधील सुधारणांसह इतर मुद्द्यांवर चर्चा केली. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)च्या वार्षिक बैठकीत जागतिक सार्वजनिक वस्तूंमधील खाजगी भांडवलाचा सहभाग, ऊर्जा सुरक्षा आणि बहुपक्षीय विकास बँकांच्या सुधारणांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


दरम्यान, भारताच्या जी-२० यजमानपदाच्या काळात २०२३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र तज्ज्ञ गटा(आयईजी)ने बहुराष्ट्रीय विकास बँकांच्या सुधारणांच्या तिहेरी अजेंडाची शिफारस केली आहे. गरिबी निर्मूलन करणे, सामायिक समृध्दीला चालना देणे आणि २०३० पर्यंत जागतिक बाजारपेठाला शाश्वत कर्जाची पातळीत वृध्दी करणे यांसारख्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

यूके वुड्स संस्थांना ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जागतिक बँक आणि आयएमएफ यांनी संयुक्तपणे बोलावलेल्या सल्लागार यंत्रणेवर या बैठकीत चर्चा झाली. ब्रेटन वूड्स इन्स्टिट्यूट हा आयएमएफ आणि जागतिक बँकेचा एक समूह असून अध्यक्ष रोजगार, ज्ञान पायाभूत सुविधा आणि बँक करण्यायोग्य प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यावरही त्यांनी भर दिला. बंगा यांनी कौशल्य, पाणी आणि स्वच्छता आणि शहरी विकास यासह भारताच्या अर्थसंकल्पीय प्राधान्यांसोबत सहकार्य करण्याची भूमिका मांडली.