एचडीएफसी बँकेच्या निव्वळ नफ्यात ५ टक्के वाढ

    19-Oct-2024
Total Views | 34
hdfc bank total profit raised


मुंबई :   
 एचडीएफसी बँकने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. खाजगी क्षेत्रातील अग्रणी असलेली एचडीएफसी बँकने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. तिमाहीत निव्वळ नफ्यात ५ टक्के वाढ झाली असून १६,८२१ कोटी रुपयांची नोंद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात मोठी वाढ दिसून आली आहे.

दरम्यान, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न ८५,५०० कोटी रुपये झाले. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत ७८,४०६ कोटी रुपये होते. बँकेचा निव्वळ नफा गेल्या वर्षी याच तिमाहीत १६,८११ कोटींवरून ६ टक्के वाढीसह १७,८२६ कोटी रुपये झाला आहे.

निव्वळ बुडीत कर्ज(एनपीए) गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.३५ टक्क्यांवरून ०.४१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. चालू आर्थिक वर्षांत बुडीत कर्जांमध्ये किचिंत वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच, बँकेला व्याजावरील उत्पन्नातून मोठा लाभ मिळाला आहे. व्याज उत्पन्न ७४,०१७ कोटी रुपये इतके आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ६७,६९८ कोटी रुपये इतके होते.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121