सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होणार निवृत्त, कोणाच्या हाती असणार धुरा?
17-Oct-2024
Total Views | 207
नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या ऐवजी दुसरे ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. याचा प्रस्ताव स्वत: धनंजय चंद्रचूड यांनी निवृत्तीआधी मांडला आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून न्यायमूर्ती खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होतील असे सांगण्यात आले. जर केंद्र सरकारने चंद्रचू़ड यांची शिफारस मान्य केल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे ५१ सरन्यायाधीश असतील.
लाइव्ह कायद्यानुसार, भारताचे सरन्याधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यत असण्याची शक्यता आहे. ते आणखी सात महिने आपली सेवा करतील असे सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती खन्ना यांची जानेवारी २०१९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत संजीव खन्ना?
संजीव खन्ना हे न्यायपालिका क्षेत्रात काम करत आहेत. १९८३ सालापासून ते दिल्ली बार कॉन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात तीस हजारी न्यायालयात त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात वकिली केली. घटनात्मक कायदा, कर आकारणी, विविध लवाद, व्यावसायिक कायदे. संस्थांचे कायदे आणि पर्यावरण काद्यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यांनी यश संपादल केले आहे.