मुंतजीर सरनोबत ¨कामगार केसरी° ; नृसिंह पाटील ¨कुमार केसरी"

सांगली येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न!

    28-Jan-2024
Total Views | 67

Sangli


सांगली :
कामगार विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा ¨कामगार केसरी° किताब धाराशिवच्या मुंतजीर सरनोबत याने पटकावला असून कुंभी कासारीचा नृसिंह पाटील हा ¨कुमार केसरी° किताबाचा मानकरी ठरला आहे. कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते विजेत्यांचा मानाची गदा, मानाचा पट्टा आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
 
आमदार अरुण लाड, आमदार गोपिचंद पडळकर, कल्याण आयुक्त रविराज इळवे, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, पै.पृथ्वीराज पवार, ज्येष्ठ वस्ताद बाबाराजे महाडिक, समशेर कुरणे, प्रदीप कांबळे, भारती चव्हाण, माजी महापौर संगिता खोत, विठ्ठल खोत, सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, मनोज पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने सांगली येथे राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे २६ व २७ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. राज्यातील एकूण २३७ पैलवान स्पर्धेत सहभागी झाले होते. कामगार आणि त्यांच्या पाल्यांना विविध खेळ व स्पर्धांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची कामगार विभागाची भूमिका आहे असे सांगत कामगार मंत्र्यांनी कामगार केसरी व कुमार केसरी स्पर्धेसाठी असलेली फिरती गदा या वर्षापासून कायमस्वरुपी विजेत्यांजवळ राहील, अशी घोषणा यावेळी केली. तसेच कामगार किंवा कामगार पाल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होत असेल तर त्याच्या खर्चासाठी कामगार विभाग त्याला मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.
 
विजेत्यांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे :
 
कामगार केसरी - प्रथम क्रमांक मुंतजीर सरनोबत (सद्गुरु सह. साखर कारखाना, धाराशिव), द्वितीय क्रमांक नाथा पवार (उत्कर्ष भोजनालय, सांगली), तृतीय युवराज धर्मराज चव्हाण (विठ्ठल कार्पोरेशन लि, महेशगाव), उत्तेजनार्थ अंकुश ईश्वर माने (क्रांतिअग्रणी कुंडल).
 
कुमार केसरी : प्रथम क्रमांक नरसिंह रंगराव पाटील (कुंभी कासारी), द्वितीय क्रमांक प्रथमेश जाधव (कुंभी कासारी), तृतीय क्रमांक अजित मल्लाप्पा कुद्रेमणकर (महा.इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कोल्हापूर), उत्तेजनार्थ अविराज धनाजी माने (सद्गुरु सह.साखर कारखाना, कुडुस)
 
गट पहिला (५७ किलो) : प्रथम क्रमांक विनायक विष्णू रावण (कुंभी कासारी), द्वितीय क्रमांक अमित दाजी साळवी (दुधगंगा वेदगंगा, बिद्री), तृतीय क्रमांक निनाद मोहन बडरे (बाबासाहेब मिल्क, आटपाडी), उत्तेजनार्थ स्वप्नील भिमराव शेलार (त्रिमुर्ती ग्रुप, सातारा).
 
गट दुसरा (६१ किलो) : प्रथम क्रमांक सुरज संभाजी अस्वले (दुधगंगा वेदगंगा), द्वितीय क्रमांक रविंद्र संजय लोहार (श्री इंटरप्रायझेस, कागल), तृतीय क्रमांक अतुल भिमराव चेचर (कुंभी कासारी), उत्तेजनार्थ वैभव नामदेव जाधव (ज्ञानेश्वरी सह. कारखाना, अहमदनगर).
 
गट तिसरा (६५ किलो) : प्रथम क्रमांक करणसिंह प्रकाश देसाई (कुंभी कासारी), द्वितीय क्रमांक अजय बाबासो कापडे (त्रिमुर्ती ग्रुप, फलटण), तृतीय क्रमांक प्रतिक नामदेव साळोखे (कुंभी कासारी), उत्तेजनार्थ विश्वजीत सर्जेराव वाघ (महा.इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सांगली).
 
गट चौथा (७० किलो) : प्रथम क्रमांक निलेश आब्बास हिरुगडे (दुधगंगा वेदगंगा), द्वितीय क्रमांक संकेत सरदार पाटील (कुंभी कासारी), तृतीय क्रमांक आकाश प्रभाकर कापडे (त्रिमुर्ती ग्रुप, फलटण), उत्तेजनार्थ रोहण दशरथ पाटील (दुधगंगा वेदगंगा).
 
गट पाचवा (७४ किलो) : प्रथम क्रमांक ओंकार एकनाथ पाटील (कुंभी कासारी), द्वितीय क्रमांक ओंकार रविंद्र फडतरे (म.रा.प. सातारा), तृतीय क्रमांक जय संदिप भांडवले (महा. इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कागल), उत्तेजनार्थ किरण विष्णू राणे (श्री सद्गुरु सा.का. राजेवाडी).

अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121