ज्या मंदिरासाठी ५०० वर्ष संघर्ष केला, ते श्रीरामाचे भव्य मंदिर पाहून साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांना अश्रू अनावर
22-Jan-2024
Total Views | 91
लखनौ : अयोध्येत आज २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचेंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. देशभरात या आनंदामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. अयोध्येतील या सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थीत होते. ज्या एका मंदिरासाठी ५०० वर्ष संघर्ष केला, ते श्रीरामाचे भव्य मंदिर पाहून साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांना अश्रू अनावर झाले.
या प्रसंगी गळाभेट घेत दोघींनी एकमेकींचे अभिनंदन केले. साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती या दोघींचेही रामजन्मभुमीच्या लढ्यामध्ये अभुतपुर्व योगदान आहे. १९८० ला जेव्हा विश्व हिंदु परीषदेने रामजन्मभुमी आंदोलन सुरु केले तेव्हा साध्वी ऋतंभरा या आंदोलनातील प्रमुख महीला चेहरा होत्या. या आंदोलनात आपल्या आक्रमक भाषणांतुन समाजाला संघटीत करण्य़ापासुन ते १९९० व १९९२ ला कारसेवा करण्यापर्य़ंत साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यामुळे आज राममंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत असताना हिंदुंनी ५०० वर्षे केलेल्या संघर्षानंतर आज होत असलेलल्या स्वप्नपुर्ती मुळे या दोघींनाही अश्रु अनावर झाले. या ठिकाणी गळाभेट घेत दोघींनी एकमेकींचे अभिनंदन सुद्धा केले.