५०० वर्षांचा वनवास संपवुन श्रीराम परतले; भव्य राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
22-Jan-2024
Total Views | 49
लखनौ : अयोध्येत भव्य राममंदिरात प्रभु श्रीरामचंद्रांचा बहुप्रतिक्षीत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची संपुर्ण भारतीय आतुरतेने वाट पाहात होते. भारतभर त्यासाठी गेले १ ते २ महीने जोरदार तयारी केली जात होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुख्य उपस्थीतीत हा सोहळा पार पडला.
या सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल त्याचबरोबर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थीत होते. या सोहळ्यासाठी देशभरातुन जवळपास ७००० हुन अधीक मान्यवरांना आमंत्रीत करण्यात आले होते. ज्यामध्य़े सर्वक्षीय राजकीय नेते, कलाकार, खेळाडू, त्याचबरोबर रामजन्मभुमी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते, कारसेवक व या आंदोलनात बलिदान दिलेल्या कारसेवकांचे परिवारजन यांचा समावेश होता.
हा सोहळा जरी अयोध्येत पार पडला असला तरी त्याचा आनंद मात्र संपुर्ण देशभरात पहायला मिळतो आहे. देशभरातील गल्ल्या, रस्ते भगव्या पताकांनी सजलेले आहेत. मंदिर, घरे, कार्यांलये, विद्युत रोशणाइने सजली आहेत. ज्या प्रकारे त्रेता युगात श्रीराम वनवासातु परतल्यानंतर त्यांच्या प्रजेने दिवाळी साजरी केली होती त्याचप्रकारे आज सर्व लोक रामलल्लांच्या अयोध्येत येण्याच्या निमित्ताने आपल्या घरी दिवाळी साजरी करत आहेत.