ठाणे : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री ह्यांच्या ११९व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या गौरवास्पद स्मृतीना उजाळा देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे तर्फे ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे ह्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
"लालबहादुर शास्त्री - व्यक्ती आणि कार्य" या विषयावरील हे व्याख्यान ठाण्यातील घंटाळी येथील सहयोग मंदिर, २ रा मजला येथे मंगळवार, दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. तरी, जास्तीत जास्त नागरिकांनी व्याख्यानास उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणेचे अध्यक्ष आनंद काळे आणि सचिव मनिष पाटील यांनी केले आहे.