मुंबई : अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला. सिद्धिविनायकाचे हे मंदिर उत्तराभिमुख आहे. अष्टविनायकांपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जीची सोंड उजवीकडे आहे. या मूर्तीचे महत्त्व म्हणजे बाप्पाने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी व सिद्धी विराजमान आहेत.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
भगवान विष्णू ध्याननिद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैटभ दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणीत होते. त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांची ध्याननिद्रा भंग करून मधु व कैटभ यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाही व त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवले त्यावर भगवान शंकरांनी मधु व कैटभाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली. त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीशी मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली व येथेच गणपतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या व त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु व कैटभाचा पराभव केला. अशी या गणपतीची आख्यायिका सांगितली जाते.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq