वाढदिवसानिमित्त मोदींना मिळाल्या संस्कृत शुभेच्छा!
17-Sep-2023
Total Views | 65
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०९ सप्टेंबर, २०२३) त्यांचा ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत.वाढदिवसानिमित्त द्वारका सेक्टर २१ मेट्रो स्टेशनपासून नवीन द्वारका सेक्टर २५ मेट्रो स्टेशनपर्यंत विमानतळ एक्सप्रेस लाइनच्या विस्ताराचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला.
दरम्यान दिल्ली मेट्रोतील अनेक प्रवाशांनी त्यांना वाढदिवसाची गाणी गाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींच्या शेजारी बसलेल्या एका मुलीने त्यांना संस्कृतमध्ये शुभेच्छा दिल्या.
जन्मदिन मिदम् अयि प्रिय सखे ।
सन्तनो तु ते सर्वदा मुदम् ॥
प्रार्थयामहे भव सतयुषि ।
इश्वरः सदा त्वां च रक्षतु ॥
याचा अर्थ होतो की, माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आम्ही प्रार्थना करतो की देव नेहमी तुझे रक्षण करो.