सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी आजच अर्ज करा

    28-Aug-2023
Total Views | 62
Maharashtra PWD Recruitment 2023

मुंबई :
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीप्रक्रियेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले असून, इच्छूक आणि पात्र उमेदवारांना ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार असून यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले असून ‘व्यवस्थापकीय संचालक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या केंद्र शासनाच्या सेवेतील किमान स्तर (लेव्हल- १४) वेतनश्रेणीतील किंवा राज्य अभियांत्रिकी सेवेतील किमान स्तर (लेव्हल एस-३०) वेतनश्रेणीतील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी अर्ज करू शकतात.

तसेच, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज पाठविण्याचा पत्ता सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ३२ येथे पाठवायचा आहे. त्याचबरोबर भरतीसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट pwd.maharashtra.gov.in ला भेट द्या.


अग्रलेख
जरुर वाचा