हिंदूंना मंदिरात डांबून मारण्याची योजना बनवत होते कट्टरपंथी; प्रत्यक्षदर्शी ने सांगितली सत्य परिस्थिती
02-Aug-2023
Total Views | 706
चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मेवातच्या नूह येथे हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर झालेल्या हल्ल्यामागे मोठा कट असल्याची शंका व्यक्त केली आहे. पीडित जे काही बोलत आहेत त्यावरूनही हा हल्ला अचानक नव्हता हेच दिसून येते. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. मुस्लिम जमाव हिंदूंची वाट पाहत होता. हिंदूंना रात्रीपर्यंत मंदिरात रोखून धरून त्यांची हत्या करण्याची त्यांची योजना होती. असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
तो म्हणाला की, “जमाव यात्रा नल्हार महादेव मंदिरात येण्याची आणि त्यानंतर निम्मे लोक फिरोजपूर झिरकाकडे जाण्याची वाट पाहत होते. काही हिंदू त्या बाजूला गेल्यावर मुस्लिमांनी दगडफेक आणि वाहनांवर गोळीबार सुरू केला. दर्शन करून आम्ही फिरोजपूर झिरकाकडे निघालो होतो. तेव्हाच मला तिथे दगडफेक झाल्याचा फोन आला. तिथे पोहोचल्यावर वाहनांवर गोळीबार आणि दगडफेक झाल्याचे दिसले. आमचे काही सोबती जखमी अवस्थेत पडले होते. आम्ही जखमींची काळजी घेत असताना ५०-६० जणांच्या जमावाने दगडफेक सुरू केली. आमच्याकडे काहीच नव्हते, त्यामुळे काही करू शकलो नाही.
ते पुढे म्हणाले की, “दगडफेकी नंतर काही वेळातच जोरदार गोळीबार सुरु झाला. १-२ राउंड नाही तर २००-२५० राऊंड फायर करण्यात आले. गोळीबार कुठून झाला हे समजू शकले नाही. पण आम्ही पूर्णपणे उघड्यावर होतो. त्यांना हवे तसे ते मारत होते. माझ्या समोर किती लोकांना गोळ्या घातल्या आहेत माहीत नाही. तिथे उपस्थित असलेले पोलीस आम्हाला सोडून पळून गेले होते.
ते पुढे म्हणाले की, “मंदिरातील हिंदूंना रात्रभर थांबवणे हा त्यांचा उद्देश होता. नऱ्हाड महादेव मंदिरात महिला, लहान मुले, वृद्ध घाबरून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढले. आम्ही आमच्या घराकडे निघालो तेव्हाही दगडफेक झाली. त्यांची तयारी पाहता अचानक हिंसाचार झाल्याचे दिसून येत नाही. त्यासाठी आधीच तयारी सुरू होती. १६-१६ वर्षांची मुलं गुडघ्यावर बसून गोळीबार करत होती.