जळगावात खळबळ! राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई

    18-Aug-2023
Total Views | 690

ED


जळगाव :
जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
 
स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या थकीत कर्जाज्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
 
ईडीने माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर एकाच वेळी छापेमारी केली. सर्व ठिकाणाच्या फर्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची ईडीकडून तपासणी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे एकूण ६० कर्मचारी आणि अधिकारी या कारवाईत सहभागी आहेत. दरम्यान सीबीआयने गेल्यावर्षीदेखील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..