सांगलीत शाळेची बस उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी
16-Aug-2023
Total Views | 131
सांगली : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून अशीच आणखी एक घटना पुढे आली आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ येथील आनंद सागर पब्लिक स्कुलची बस उलटल्याची घटना घडली आहे. यात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
काल १५ ऑगस्ट रोजी एमएच १२ एफसी ९११३ ही बस सकाळी लवकर आनंद सागर पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यावेळी लांडगेवाडी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ही बस उलटली. यात सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विभावरी विनायक पोतदार, विकास विनायक पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी अभिजीत सगरे, समृध्दी सामंता माळी व अनन्या प्रदीप पवार अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.