नवी दिल्ली : देशभरात स्वातंत्र्यदिनाची मोठी धामधूम सुरू आहे. प्रत्येकजण देशभक्तीच्या रंगात मग्न आहे. त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 'हर घर तिरंगा' मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत तिरंग्यासोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करायचा आहे. त्याचवेळी, सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे ज्यामध्ये तुम्ही तिरंग्यासोबत तुमचा सेल्फी अपलोड करू शकता. या पोर्टलवर आतापर्यंत नऊ कोटींहून अधिक सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
एवढेच नाही तर जेव्हाही तुम्ही तुमचा सेल्फी या पोर्टलवर अपलोड करता तेव्हा त्यासोबत सेल्फी अपलोड करणाऱ्याला ई- प्रमाणपत्रही दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले होते की, देशाच्या ७७ स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व देशवासीयांनी आपल्या घरी तिंरगा लावावा. , तसेच सोशल मीडियाच्या डीपीमध्ये तिरंग्याचे छायाचित्र टाकावे आणि hargarhtiranga.com वेबसाइटवर तिरंगासोबतचा फोटो शेअर करावा.
जे नागरिक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान argarhtiranga.com वेबसाइटवर भारतीय ध्वजासह सेल्फी अपलोड करतील त्यांना प्रमाणपत्र मिळेल. दरम्यान प्रत्येक कुटुंब तिरंगा वेबसाइट अपलोड करत आहे. आतापर्यत ९ करोड हून अधिक लोकांनी सेल्फी अपलोड केला आहे. वेबसाइटनुसार सेल्फी अपलोड करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
हर घर तिरंगा वेबसाइटच्या होम पेजवर ध्वज आणि डिजिटल तिरंगासोबत सेल्फी अपलोड करण्याचे दोन पर्याय आहेत. खाली स्क्रोल केल्यावर, वापरकर्त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल, अभिनेता अनुपम खेर आणि गायक कैलाश खेर यांच्यासह भारतीय ध्वजासह केंद्रीय मंत्री, अभिनेते आणि खेळाडूंची छायाचित्रे दिसतील.
या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दि. १३ ऑगस्ट रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे डिस्प्ले पिक्चर बदलून राष्ट्रध्वज लावला. देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी लाल किल्ल्यावर विविध मान्यवर, मंत्री आणि शाळकरी मुलांसह इतरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवला.