भारत-२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र : गणित व संकल्पना (उत्तरार्ध)

    11-Aug-2023
Total Views | 150
India-A-developed-nation-by-2047-Part 2

कालच्या भागात आपण विकसित राष्ट्राची परिभाषा आणि निकष याविषयीचे गणित आणि संकल्पना जाणून घेतली. परंतु, विकसित राष्ट्रासाठी केवळ आर्थिक विकास अपेक्षित नसून त्याला मानव विकासाची जोड देणेही तितकेच आवश्यक. त्यानिमित्ताने मानवी विकासाची भारतीय संकल्पना आणि ब्रिटिशपूर्व भारतातील संपन्नता यांचा आढावा घेणारा हा लेख...

‘मानव विकासा’ची भारतीय संकल्पना

माणसाचा समग्र विकास म्हणजे पंचकोशात्मक विकास, ही भारतीय संकल्पना आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश व आनंदमय कोश अशा पाच कोशांनी माणसाचे व्यक्तिमत्त्व विकसित होते. स्थूलमानाने, अथवा अधिक सोप्या शब्दात, असे म्हणता येईल की शरीर, प्राण, मन, बुद्धी व आत्मा अशा पाच घटकांचा विकास म्हणजे समग्र विकास होय. अन्नमय विकास म्हणजे शरीराच्या सर्व अंग-उपांगांची समुचित वृद्धी आणि विकास होणे. व्यक्तीचे शरीर ही यंत्रशक्ती आहे. प्राण ही त्यातील कार्य शक्ती आहे. प्राणमय शक्तीच्या ऊर्जेच्या बळावर शरीर कार्य करू शकते. शरीरातील पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये यावर मनाचे अधिराज्य असते. मन कायम संकल्प-विकल्प यांच्या द्वंद्वात गुरफटलेले असते. मन संयमित ठेवणे, हा मनाचा विकास असतो. हा मनोमय कोशाचा विकास असतो. कार्याची दिशा योग्य आहे का? उद्दिष्ट साध्य व्हावे म्हणून काय करावे, हे ‘बुद्धी’ ठरविते. हा विज्ञानमय कोशाचा विकास असतो. शेवटी कामाचा आनंद मिळणे, वा दुःखी होणे, हा आत्म्याचा विषय असतो. आत्मा, चित्त समजून घेणे, हा आनंदमय कोशाचा विकास असतो.

हे पाच घटक प्रत्येक माणसात असतात. तसेच, ते राष्ट्रपुरुषाचे अंगीही असतात. राष्ट्रपुरुषाच्या या सर्व पाच घटकांचा विकास म्हणजे राष्ट्राचा समग्र विकास होऊ शकतो. स्वातंत्र्यपूर्व कालावधीत राष्ट्राचे शरीर जर्जर होते. प्राणमय कोश विविध स्वातंत्र्य चळवळींना ऊर्जा देत होता; पण मन अस्वस्थ होते. बुद्धी विविध विचारांनी ग्रासली होती. आनंदमय कोशात शांती नव्हती. एकूण राष्ट्रपुरूष असमाधानी होता, अस्वस्थ्य होता. स्वातंत्र्यानंतर देश परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जाऊ लागल्या. राष्ट्रीय मन प्रगतीच्या उपायावर लक्ष्य केंद्रित करावयास लागले.राष्ट्राची बुद्धी प्रगतीचे अनेक उपाय विचार करू लागली. भारताचा विकास घडवून आणणे, हा संपूर्ण जनतेचा आनंदाचा विषय होण्यास सुरुवात झाली.

स्वातंत्र्यानंतरची पहिली ६०-६५ वर्षे ही प्राथमिक प्रायोगिक अवस्थेतील होती. पाचही कोशांचा विकास समतोल पद्धतीने झाला नाही. देशाचा भौगोलिक आकार व त्यात राहणार्‍या जनतेची स्थिती, ही देशाची शारीरिक स्थिती सहज समजणारी होती. मात्र, भारताचा प्राण म्हणजे काय? अनेक विचारप्रवाह हे चंचल मनस्थितीचे निदर्शक होते. बुद्धीही विविध तर्र्‍हेने काम करत होती. देशाची सर्वंकष प्रगती, ही आनंददायक ठरण्यासाठी काही कालावधी लागणार होताच.

भारताची मूळ जीवनधारा ही एक हजार वर्षांच्या बाह्य आक्रमण काळात झाकोळलेली होती. युरोपियन औद्योगिक क्रांती, साम्यवाद, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आदी नवीन विचारधारा त्यात मिसळल्या होत्या. या सर्व विचारधारा भौतिक विकासासाठी भुरळ पाडणार्‍या ठरत होत्या. ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाने तर समाजमन दूषित केले गेले होते. धर्म म्हणजे ‘रीलिजन’ नव्हे, हे सत्य भारतीय जनतेला अजूनही सर्वदूर पटलेले नाही. या सर्वांमुळे भारताचा पंचकोशात्मक विकास साधण्यात बर्‍याच अडचणी येत आहेत.

सर्वंकष विकास साधावयाचा तर व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी या चार घटकांचा समतोल साधावा लागतो. व्यक्तीच्या समग्र विकासाने समष्टी जीवनातही स्नेह, सहकार्य, परस्परपूरकता, दुर्बल घटकासंबंधी आस्था, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची स्वाभाविक तत्परता, आतिथ्यशीलता अशा अनेकविध गुणांचा विकास अभिप्रेत असतो. कुटुंब व्यवस्था नष्ट करून केवळ शासन आणि प्रजा देशाचा विकास घडवून आणू शकत नाही. सृष्टी म्हणजे पर्यावरण हा मोठा घटक समाजजीवनावर परिणाम करतो. मानवास गेल्या १०० वर्षांतील अनुभवाने विविधांगी पर्यावरणाची काळजी घेणे, हे नितांत आवश्यक आहे. हे पटले आहे. परमेष्टी म्हणजे निसर्गनिर्मित ज्या गोष्टी आहेत, त्या एका विशिष्ट पद्धतीने कार्यरत असतात. त्यास आपण परमेष्टी म्हणतो.

भारतीय चिंतनाने आपले समाजजीवन चार पुरुषार्थाचे आधारे घडवावे, असे प्रतिपादिले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ते चार पुरुषार्थ. येथे धर्म म्हणजे कर्तव्यपरायणता, अर्थ म्हणजे संपत्ती, काम म्हणजे कामना, इच्छा, मोक्ष म्हणजे अंतिम ध्येय, जीवनहेतू. व्यक्तीने, समाजाने, संस्थांनी आपल्या कुवतीप्रमाणे संपत्ती मिळवावी, आपल्या कामना, इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात. पण, त्या आपले कर्तव्य व राष्ट्राचा जीवन हेतू याच्या चौकटीत मिळवावे. चौकट सोडून मिळविलेला पैसा व अमर्याद कामना पूर्ती समाजाच्या नाशास कारणीभूत होतात. नदीच्या पाण्याने दोन्ही किनारे सोडून वाहावयास सुरुवात केली, तर आजूबाजूच्या प्रदेशाचे, शेतीचे अपरिमित नुकसान होते. धर्मप्रेम म्हणजे कर्तव्यतत्परता हा भारताचा स्वभाव आहे. जीवनहेतूनुसार राष्ट्रात सर्वांगीण जीवन असेल, तर राष्ट्र परमसुखाची अनुभूती घेऊ शकते.

देशातील पायाभूत सुविधा, जीवनमान सुकर व्हावे. म्हणून अनेक सुविधा निर्माण करणे यांनी देशाच्या शरीराची निगा राखली जाते. ते आवश्यक आहे. पण, त्याचबरोबर समाज कर्तव्य परायण असणे व समाजाच्या प्रत्येक घटकास राष्ट्राच्या जीवन हेतूची माहिती असणे आवश्यक आहे. या दोन्हीच्या मर्यादेत प्रत्येकाने आपली अर्थलालसा व उपभोग प्रवणता संयमित ठेवली, तर त्या समाजाचा उत्कर्ष सर्वांना समाधानाचा होईल. आपल्या जीवन हेतूविषयी अभिमान असावयास हवा. पण, या अभिमानास कर्मशीलतेची जोड हवी. समाजाच्या एकत्रित कर्मशीलतेस ‘विराट’ म्हटले आहे. समाजाची ‘विराट शक्ती’ हीअंतर्गत सुरक्षिततेची हमी असते.भारत २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र’ करण्याच्या प्रयत्नात या वरील गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
 
बलाढ्य राष्ट्र-महासत्ता

भारतास २०४७ पर्यंत महासत्ता बनायचे आहे. एक बलाढ्य राष्ट्र म्हणून उदयास यायचे आहे. भारताने महासत्ता बनणे, ही नवी गोष्ट नाही. भारत १७०० साली म्हणजे केवळ ३०० वर्षांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत देश होता. हे (जएउऊ)च्या २००१ साली केलेल्या अहवालाने दाखवून दिले आहे. १७०० साली भारताचा जीडीपी ९० हजार, ७५० दशलक्ष डॉलर होती, तर त्यावेळी पश्चिम युरोपमधील १४ राष्ट्रांची जीडीपी ८३ हजार, ३९५ तर अमेरिकेची जीडीपी ५३५ दशलक्ष डॉलर होती. त्यानंतर युरोपियन देशांची, अमेरिकेची जीडीपी वाढत गेली. भारताची जीडीपी कमी होत गेली.

आर्थिकदृष्ट्या भारतास संपन्न व्हायचे आहे. पण, केवळ आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक व्हायचे म्हणजे, महासत्ता बनायचे, अशी भारताची कल्पनानाही. भारताचा प्राचीन इतिहास उज्ज्वल आहे, भारतीयांनी आपल्या विचारसंपदेच्या शक्तीच्या जोरावर संपूर्ण जगावर अधिराज्य गाजविले आहे. इसवी पूर्व सातव्या शतकात बौद्ध धर्माची स्थापन झाली. बौद्ध धर्माचे प्रचारक भारताबाहेर चीन, जपान, आदी पौरात्य देशात गेले. जपान आजही भारत ही त्यांच्या धर्माची जन्मभूमी मानतो. १२व्या शतकात भारतीय राजा दुसरा सूर्यवर्मन याने कंबोडिया येथील ‘अंकोरवट’ हे दहा हजार एकर जमिनीवर मंदिर बांधवून घेतले. आजही ते जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. अशी स्थापत्य मंदिरे अथवा शिल्पे जगाच्या सर्व भागांत आढळतात. भारताने जगाचा संचार केला होता व आपल्या विचारसंपदेने जगास मोहित केले होते.

भारतात सनातन काळापासून जी ग्रंथसंपदा निर्माण झाली आहेत, त्यात मानवी जीवनाच्या विविध पैलूंचे चित्रण आहे. मानवी स्वभावाचे चित्रण आहे. जीवनाच्या अनंत समस्यावर उपाय दर्शविणारे लेखन आहे. गेल्या हजारो वर्षांत भौतिक प्रगतीने अचंबा वाटावा, अशी अनेक उपकरणे तयार केली आहेत. पण, मानव दर्शन, मनाचे व्यापार, शरीरातील अनेक अवयवांची कार्ये सनातन काळापासून तशीच आहेत. त्यामुळे भारतीय विचार हे यशस्वी जीवन पद्धतीस दिशादर्शक आहेत. आजच्या प्रत्येक समस्येवर भारतीय चिंतनात उत्तर आहे. हे आता भारताने जगास पटवून द्यावयास हवे. भारताचा जीवन हेतू ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ हा आहे. संपूर्ण जग सुशील करावयाचे आहे. संपूर्ण जगास भारत एक मार्गदर्शक स्वरुपात उपयोगी पडू शकतो. ही महानता भारतास निर्माण करावयाची आहे. सैनिक बळावर देश पादाक्रांत करणे, तेथे अधिपत्य निर्माण करण्यास नरसंहार करणे, हे भारतीय मनास कधीच पटले नाही. यापुढेही असा नरसंहार करणे, कसे योग्य असते, असे धडे भारतास शिकून घ्यायचे नाहीत. भारत पूर्वी विश्वगुरु होता. ती स्थिती पुन्हा निर्माण करावयाची आहे. भारतात या आदर्श स्थितीची प्रयोगशाळा निर्माण करावयाची आहे.

दि. २१ जून हा ’आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून १७० देशांनी मान्य केला. ‘जी २०’ देशांचे अध्यक्षपद भारतास मिळाले. ‘जी २०’च्या देश परदेशातील सदस्यांच्या ५०० बैठका भारतात घडतात व त्यासाठी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे ध्येय वाक्य स्वीकारले जाते. ही सर्व भारत विश्वगुरु होऊ शकतो, याची सुचिन्हे आहेत.

भारतास २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र व्हायचे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था २५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेणे, दरडोई उत्पन्न दहा हजार डॉलरपर्यंत नेणे, भारतीय संकल्पनेप्रमाणे देशाचा पाच कोशात्मक विकास घडवून आणणे, कार्यशीलतेचे ‘विराट’ स्वरूप प्रकट करणे, व्यष्टी, समष्टी, सृष्टी व परमेष्टी यांच्या विकासात समतोल व समन्वय राखणे, ‘धर्मव मोक्ष’ म्हणजे ‘कर्तव्य परायणताव जीवन हेतू’ यांच्या मर्यादेत अर्थनिर्मिती व उपभोग संयमित करून चार पुरुषार्थांच्या आधारे समाज जीवन प्रफुल्लीत करणे, भारतीय विचार व जीवन पद्धतीने जगातील समस्यांना विधायक प्रयोग सिद्ध उत्तरे देऊन विश्वगुरुपद पुनःश्च प्राप्त करणे हे अपेक्षित आहे. अखेर ‘कृण्वन्तो विश्वार्यम’ विश्वाला सुशील करावयाचे आहे, हे अंतिम ध्येय देशातील १४० कोटी नागरिकांनी व परदेशातील भारतीय वंशाचे पाच कोटी यांनी उराशी बाळगायचे आहे, त्याच्या पूर्तीसाठी कार्यशील राहावयाचे आहे, ‘विराट’रूप प्रकट करावयाचे आहे. त्यातच मानवजातीचे कल्याण आहे, भारतीयांचे कल्याण आहे.

नारायण गुणे 
९८५०५३७०६९
 
अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121