एसएनडीटीचा १०८ वा स्थापना दिन

    06-Jul-2023
Total Views |
 

मुंबई : 
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ जे महिलांच्या उच्चशिक्षणाशी सन्मानार्थ समजले जाते, या वर्षी १०८ वा स्थापना दिवस समारोह शुक्रवार ७ जुलै, २०२३ रोजी विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणातील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात सायंकाळी ६.०० वाजता साजरा करीत आहे.      
     
स्त्री शिक्षणामधील विद्यापीठाचे १०७ वर्षांचे महत्वपूर्ण योगदान हे देशातील स्त्रियांसाठी व संपूर्ण भारतीय समाजासाठी अभिमानाची बाब आहे. १९१६ सालापासून या विद्यापीठाने लाखो स्त्रियांना शिक्षित केल्यामुळे प्रगतीशील समाजाची निर्मिती झाली आहे. सध्या ५०,००० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी विद्यापीठाचे ३९ विभाग, १३ संस्था आणि २६१ संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या आणि “संस्कृता स्त्री पराशक्ती’’ हे बोधवाक्य असलेल्या या विद्यापीठाचे ‘शिक्षणातून महिला सक्षमीकरण’ हे ध्येय आहे.                        
     
या वर्षी मा. श्री रमेश बैस (राज्यपाल, महाराष्ट्र राज्य) यांचे स्थापना दिवसानिमित्ता अभिभाषण होईल. मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची प्रमुख अतिथि म्हणून उपस्थिती असेल. श्री. विकासचंद्र रस्तोगी (प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची विशेष उपस्थिती असेल.  विद्यापीठाच्या कुलगुरू, प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होईल.    प्र-कुलगुरू, प्रा. रुबी ओझा कार्यक्रमास उपस्थित राहतील.
     
या कार्यक्रमात विद्यापीठातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यां स “महर्षी कर्वे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार” आणि “सर्वोत्तम महाविद्यालय पुरस्कार” प्रदान करण्यात येतील. विद्यापीठाच्या उल्लेखनीय माजी विद्यार्थिनींना देखील समारोहात सन्मानित करण्यात येईल.  

आपण सर्वांनी सदर कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कुलसचिव प्रा. विलास दत्तू नांदवडेकर यांनी केले आहे. ७ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता साजरा होणार्याा विद्यापीठ स्थापना दिवसाच्या समारंभाचे सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे.  

image.png
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.