भारतातील दाढी मिशा असलेल्या या हनुमान मंदिराबद्दल तुम्हाला माहितीयं का?

    25-Jul-2023
Total Views | 104
Salasar Balaji dham different temples of Lord Hanuman

जयपूर : हनुमानजींची अनेक अनोखी मंदिरे भारतभर स्थापन झाली आहेत. त्यापैकी आज अशाच एका हनुमान मंदिराबद्दल तुम्हाला सांगणार आहे. जिथे दाढी आणि मिशा असलेल्या हनुमानजींची पूजा केली जाते आणि संपूर्ण भारतातील कदाचित हे एकमेव मंदिर आहे. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात असलेल्या सालासर बालाजी धामविषयी जाणून घेणार आहोत.
 
आधी जाणून घेऊ मंदिराचा इतिहास?

सालासर बालाजी धामचा इतिहास १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा आहे. मोहनदास नावाचे संत हे हनुमानजींचे परम भक्त होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन हनुमानजींनी त्यांना वचन दिले की ते लवकरच मूर्तीच्या रूपात प्रकट होतील. शेवटी तो दिवस आला. १७५४ मध्ये नागौर जिल्ह्यातील आसोटा गावात एक शेतकरी आपले शेत नांगरत असताना त्याच्या नांगरावर एक कठीण दगडासारखी वस्तू आदळली. जेव्हा त्या जाट शेतकऱ्याने ती वस्तू जमिनीतून बाहेर काढली तेव्हा ती हनुमानाटी अप्रतिम मूर्ती होती.

ज्या दिवशी हनुमानजी शेतात प्रकट झाले, त्याच रात्री त्यांनी आसोटा गावातील एका ठाकूराच्या स्वप्नात येऊन हनुमानजींनी आदेश दिला की, मला सालासर धामला न्यावे. त्याच वेळी, हनुमानजींनी त्यांचे परम भक्त मोहनदास यांना देखील सांगितले की त्यांची मूर्ती बैलगाडीत येत आहे आणि जेव्हा बैलगाडी सालासर धामवर पोहोचली तेव्हा ती सोडण्यात यावी. बैलगाडी जिथे थांबेल तिथेच त्याचे मंदिर बांधावे. हनुमानजींच्या आज्ञेनुसार ज्या ठिकाणी बैलगाडी स्वतः थांबली, त्याच ठिकाणी सध्याचे मंदिर बांधण्यात आले.

जेव्हा शेतकऱ्याने हनुमानजीची मूर्ती जमिनीतून बाहेर काढली होती, तेव्हा त्याच्या पत्नीने चुरमा (लाडू) आणला होता. दोघांनी हनुमानजींना चुरमा प्रसाद अर्पण केला. तेव्हापासून सालासर धाममध्ये हनुमानजींना चूरमा अर्पण केला जातो. संपूर्ण भारतातील हे (कदाचित) एकमेव ठिकाण आहे, जिथे दाढी-मिशा असलेली हनुमानजींची मूर्ती स्थापित आहे. असे म्हणतात की हनुमानजींना त्यांचे परम भक्त मोहनदास यांनी दाढी आणि मिशामध्ये येण्याची विनंती केली होती.

सालासरमध्ये हनुमानजींच्या वास्तव्यानंतर माता अंजनीही सालासर धाममध्ये आल्या. पण दोघांनी एकत्र न राहण्याचा निर्णय घेतला. प्रथम कोणाची पूजा करायची हा प्रश्न भाविकांना भेडसावू नये म्हणून असे करण्यात आले. हनुमानजींच्या सांगण्यावरून माता अंजनी आपल्या मुलापासून काही अंतरावर बसली होती असे म्हणतात. सालासरचे हनुमान जी आपल्या भक्तांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध झाले होते असे मानले जाते.

अशा परिस्थितीत त्या महिलाही मंदिरात येऊ लागल्या, ज्यांना लैंगिक किंवा प्रजननाशी संबधित समस्या आहेत. अशा स्थितीत ब्रह्मचारी हनुमानजींनी या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर बसून माता अंजनीची प्रार्थना केली, जी माता अंजनीने आनंदाने स्वीकारली. यानंतर माता अंजनी पंडित पन्नालाल नावाच्या व्यक्तीच्या तपश्चर्येवर विराजमान झाल्या, जे मातेचे निस्सीम भक्त होते.
 
कसे पोहोचायचे

सालासरच्या बालाजी धामचे सर्वात जवळचे विमानतळ राजस्थानची राजधानी जयपूर येथे आहे, जे येथून सुमारे १८५ किलोमीटर अंतरावर आहे. सालासर हे चुरू जिल्ह्यात आहे. चुरू जंक्शनपासून मंदिराचे अंतर सुमारे ७५ किमी आहे. परंतू मंदिरापासून जवळचे रेल्वे स्टेशन सुजानगढ आहे. जे मंदिरापासून सुमारे २४ किमी अंतरावर आहे. याशिवाय सालासर धाम ते सीकर रेल्वे स्टेशन हे अंतर ५७ किमी आहे.

सालासर हे जयपूर-बिकानेर महामार्गावर वसलेले आहे. येथे जाण्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून राजस्थान राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत. याशिवाय सालासरला जाण्यासाठी जयपूर, बिकानेर आणि पिलानी येथून वाहतुकीची इतर साधनेही सहज उपलब्ध आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121